Sanjay Raut on Kolhapur Politics: ”हा काँग्रेस पक्षाचा विषय आहे. मी स्वतः त्या जागेसाठी बैठकीमध्ये सात दिवस भांडलो आहे. कोल्हापूर उत्तर ही जागा शिवसेनेने सात वेळा घेतली आहे”.
हायलाइट्स:
- काँग्रेसने ‘ती’ जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव
- मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊत म्हणाले
- कोल्हापूर उत्तरच्या वादावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
”विधानसभा निवडणुक तोंडावर असताना निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी नेत्यांनी निवडणुकीचा कार्यक्रम होईपर्यंत रश्मी शुक्ला यांच्याकडे पदभार असू नये, पोलीस महासंचालकपदी दुसऱ्या कोणीच निवड करण्यात यावी अशी मागणी निवडणुक आयोगाकडे लावून धरली होती”.
”बऱ्याच गोष्टी करून घेतल्या आहेत, सरकार बेकायदेशीर आहे त्यामुळे त्यांनी अनेक नेमणूका सुद्धा बेकायदेशीरपणे करून घेतल्या आहेत. जो अधिकारी तुरुंगात जाण्याच्या तयारीत होता, ज्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल आहेत. त्याला सरकार बदलताच त्या अधिकाऱ्यावरील गुन्हे काढून त्यांना थेट राज्याच्या पोलिस महासंचालक पदाचे बक्षीस देण्यात आलं आणि त्यांच्याकडून अनेक राजकीय गैर कृत्य करून घेतली, अशी व्यक्ती भारतीय जनता पक्षाची किती जवळची असेल. अखेर पापाचा घडा भरला आणि निवडणूक आयोगालाच लाज वाटली असेल हे जर फार काळ प्रकरण टिकवलं तर निवडणूक आयोगाची उरली सुरलेली इज्जत सुद्धा धुळीस मिळेल. म्हणून अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या ताई यांना राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरून हटवण्यात आले”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.