Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

काँग्रेसने ‘ती’ जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊत म्हणाले

11

Sanjay Raut on Kolhapur Politics: ”हा काँग्रेस पक्षाचा विषय आहे. मी स्वतः त्या जागेसाठी बैठकीमध्ये सात दिवस भांडलो आहे. कोल्हापूर उत्तर ही जागा शिवसेनेने सात वेळा घेतली आहे”.

हायलाइट्स:

  • काँग्रेसने ‘ती’ जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव
  • मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊत म्हणाले
  • कोल्हापूर उत्तरच्या वादावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
संजय राऊत कोल्हापूर उत्तर मतदारसंघ

मुंबई : उत्तर कोल्हापुरात काही दिवसांपासून नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. संपूर्ण राज्यात बंडखोरांच्या माघारीसाठी प्रयत्न सुरु असताना, अधिकृत उमेदवारांचा मार्ग सुकर करण्यासाठी शिष्टाई सुरु असताना कोल्हापुरात उलट घडामोडी घडल्या. बंडखोर माघार घेत नसल्यानं काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमा राजे यांनी माघार घेतली. यामुळे काँग्रेस नेते सतेज पाटील संतापले. आपल्याला तोंडावर पाडल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या चेहऱ्यावर राग अगदी स्पष्ट दिसत होता. मधुरिमा यांच्या माघारीमुळे आता उत्तर कोल्हापुरात महायुती विरुद्ध अपक्ष उमेदवार असा संघर्ष रंगणार आहे.याचपार्श्वभूमीवर, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ”हा काँग्रेस पक्षाचा विषय आहे. मी स्वतः त्या जागेसाठी बैठकीमध्ये सात दिवस भांडलो आहे. कोल्हापूर उत्तर ही जागा शिवसेनेने सात वेळा घेतली आहे. २०१९ साली अपघाताने आम्ही हरलो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तेथे झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी सांगितलं होतं की पोटनिवडणुकीत आम्ही आपल्याला पाठिंबा देतो. पण, नंतर ही जागा आम्हाला द्या. पण काँग्रेसने ती जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव आहे. आज त्या जागेत गोंधळ निर्माण झाला आहे. पण ती जागा सहा ते सात वेळा शिवसेनेने जिंकली आहे. आम्ही महाविकास आघाडीचे खंदे समर्थक आहोत. महाविकास आघाडीला तडा जाईल, असे आम्ही काहीही करणार नाही”.
महायुतीमध्ये उडाला खटका? पुण्यातील दोन मतदारसंघात शिंदे-पवारांचे शिलेदार आमनेसामने

”विधानसभा निवडणुक तोंडावर असताना निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी नेत्यांनी निवडणुकीचा कार्यक्रम होईपर्यंत रश्मी शुक्ला यांच्याकडे पदभार असू नये, पोलीस महासंचालकपदी दुसऱ्या कोणीच निवड करण्यात यावी अशी मागणी निवडणुक आयोगाकडे लावून धरली होती”.

”बऱ्याच गोष्टी करून घेतल्या आहेत, सरकार बेकायदेशीर आहे त्यामुळे त्यांनी अनेक नेमणूका सुद्धा बेकायदेशीरपणे करून घेतल्या आहेत. जो अधिकारी तुरुंगात जाण्याच्या तयारीत होता, ज्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल आहेत. त्याला सरकार बदलताच त्या अधिकाऱ्यावरील गुन्हे काढून त्यांना थेट राज्याच्या पोलिस महासंचालक पदाचे बक्षीस देण्यात आलं आणि त्यांच्याकडून अनेक राजकीय गैर कृत्य करून घेतली, अशी व्यक्ती भारतीय जनता पक्षाची किती जवळची असेल. अखेर पापाचा घडा भरला आणि निवडणूक आयोगालाच लाज वाटली असेल हे जर फार काळ प्रकरण टिकवलं तर निवडणूक आयोगाची उरली सुरलेली इज्जत सुद्धा धुळीस मिळेल. म्हणून अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या ताई यांना राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरून हटवण्यात आले”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.