Jalgaon Omni Car Gas Blast: या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव महानगरपालिकेचे दोन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले आणि हीआग आटोक्यात आणण्यात आली.
हायलाइट्स:
- ओमनीत घरगुती गॅस भरत असताना सिलेंडरचा स्फोट
- आठ ते दहा जण जखमी
- एमआयडीसी पोलीस चौकीच्या बाजूला घडली घटना
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव महानगरपालिकेचे दोन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले आणि हीआग आटोक्यात आणण्यात आली. या भीषण आगीत भाजले गेलेल्या जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.
जळगाव शहरात अनधिकृत गॅस वाहनांमध्ये भरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करून अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. गॅस भरण्याची कुठलीही परवानगी नसताना खासगी वाहनांमध्ये गॅस भरण्याचं काम सुरु आहे. पोलीस प्रशासन या अनधिकृत वाहनांवर कारवाई करणार का? हा सामान्यांना पडलेला प्रश्न आहे. सदर वाहन एमआयडीसीच्या पोलीस चौकीच्या जवळच गॅस वाहनामध्ये अनधिकृतपणे भरत होते. मात्र या ठिकाणी पोलीस चौकीत कुठलाही पोलीस कर्मचारी नसतो आणि या वाहन अनधिकृत गॅस भरणे सोयीचे होते.