Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Jalgaon News: वाहनात घरगुती गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट, १० प्रवासी होरपळले; जळगावात खळबळ

11

Jalgaon Omni Car Gas Blast: या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव महानगरपालिकेचे दोन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले आणि हीआग आटोक्यात आणण्यात आली.

हायलाइट्स:

  • ओमनीत घरगुती गॅस भरत असताना सिलेंडरचा स्फोट
  • आठ ते दहा जण जखमी
  • एमआयडीसी पोलीस चौकीच्या बाजूला घडली घटना
Lipi
जळगाव ओमनी वाहन गॅस भरताना स्फोट

निलेश पाटील, जळगाव : ओमनीमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आठ ते दहा जण नागरिक जखमी झाल्याची घटना जळगाव शहरातील इच्छा देवी चौकात घडली आहे. जळगाव शहरातील इच्छादेवी चौकात चारचाकी वाहनामध्ये घरगुती गॅस भरत असताना अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने उभी असलेली चारचाकी वाहनासह एक दुचाकी जळून खाक झाली. ही घटना आज मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेमध्ये आठ ते दहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू आहे. यावेळी अग्निशमन बंबाच्या मदतीने ही आग विझवण्यात आली.इच्छादेवी चौकातील एमआयडीसी पोलीस चौकीच्या बाजूला असलेल्या एका पत्राच्या शेडमध्ये वाहनांमध्ये घरगुती गॅस भरत असताना अचानकपणे गँस सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोट झाल्याने भीषण आग लागली. या आगीत एकूण आठ ते दहा जण गंभीररित्या भाजले गेले, तर चारचाकी वाहन क्रमांक (एमएच १५ बीएक्स २८१२) आणि एका दुचाकीने पेट घेतल्याने दोन्ही वाहने जळून खाक झाली आहे.
खासदारकीच्या मोहात आमदारकी गेली; शिंदेंकडे गेलेला नेता अखेर भाजपवासी; ९ महिन्यांत तिसरा पक्ष

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव महानगरपालिकेचे दोन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले आणि हीआग आटोक्यात आणण्यात आली. या भीषण आगीत भाजले गेलेल्या जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.

जळगाव शहरात अनधिकृत गॅस वाहनांमध्ये भरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करून अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. गॅस भरण्याची कुठलीही परवानगी नसताना खासगी वाहनांमध्ये गॅस भरण्याचं काम सुरु आहे. पोलीस प्रशासन या अनधिकृत वाहनांवर कारवाई करणार का? हा सामान्यांना पडलेला प्रश्न आहे. सदर वाहन एमआयडीसीच्या पोलीस चौकीच्या जवळच गॅस वाहनामध्ये अनधिकृतपणे भरत होते. मात्र या ठिकाणी पोलीस चौकीत कुठलाही पोलीस कर्मचारी नसतो आणि या वाहन अनधिकृत गॅस भरणे सोयीचे होते.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.