Chandrapur Vijay Vadettiwar Video Viral: ”काँग्रेसचा हात, मतदारांचा घात” अशी टॅगलाईन लिहिलेला व्हिडिओ भाजप महाराष्ट्र या अकाउंटवरून ट्वीटवर (एक्स) व्हायरल करण्यात आलेला आहे. यात किती सत्यता आहे हे मात्र कळू शकलेलं नाही.
हायलाइट्स:
- विजय वडेट्टीवार मतदारांनाच म्हणाले हरामखोर
- भाजपने केला व्हिडिओ शेअर
- काय लिहिलं आहे पोस्टमध्ये?
काय लिहिलं आहे पोस्टमध्ये?
”काँग्रेसचा हात, मतदारांचा घात”, कॉंग्रेस नेते, @VijayWadettiwar मतदारांना हरामखोर म्हणत आहे, 20 तारखेनंतर तुला पाहून घेइन, तुमचे नाव लिहून ठेवले आहेत. अशी धमकीच त्यांनी मतदारांना दिली आहे. लोकशाहीत मतदार हा राजा असतो मात्र लोकशाही, संविधान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा काँग्रेसला सुरुवातीपासूनच तिटकारा आहे. ज्या काँग्रेसने संविधानाची पायमल्ली करत देशावर आणीबाणी लादली असंख्य सामान्य लोकांना तुरूंगात डांबून ठेवले ती काँग्रेस पुन्हा मतदारांना धमकवण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्राची जनता मतदानातून काँग्रेसची ही मस्ती नक्कीच उतरवणार…
एका युजरने लिहिलं आहे की, ”हे आहेत विरोधी पक्षनेते शोभते का यांना अशी भाषा उमेदवार धमकी देत आहे याची दखल निवडणूक आयोगाने घ्ययला पाहिजे. पराभवाच्या भीतीतून त्यांचे वक्तव्य” असं एका युजरने लिहिलं आहे. तर, ”काय ही भाषा जनता नकी घरी बसवेल याला”, असा थेट इशाराच एका युजरने दिला आहे.
चंद्रपूरच राजकारण कुणी नासवलं?
कधी चंद्रपूरच्या शुद्ध राजकारणाचे दाखले राज्यात दिले जायचे. आता इथलं राजकारण पूर्णपणे नासलं असल्याचे बोललं जातं आहे. एक खासदार जातीवर बोलतोयं, मंत्री महिलांचा अपमान करतोय, यवतमाळ जिल्हातील वणी येथील भाजपच्या कार्यक्रमात ओबीसी बांधवावर खालच्या पातळीची टीका करण्यात आली. त्याची धग चंद्रपूरपर्यंत येऊन पोहचली आहे. या गढूळ झालेल्या राजकारणाला जबाबदार कोण? याची चर्चा आता रंगली आहे. ज्यांना केवळ जातीय समीकरणच दिसतात त्यांनी येथील राजकारणाला खालचा पातळीवर नेवून ठेवल्याची चर्चा रंगली आहे.