Rahul Gandhi Nagapur Constituent Program: ओबीसी युवा मंचचे उमेश कोर्राम तसेच अनिल जयहिंद यांनी या संमेलनासाठी पुढाकार घेतला आहे. हा अराजकीय कार्यक्रम असल्याचा काँग्रेस नेत्यांचा दावा आहे. या संमेलनाची सर्व सूत्रे काँग्रेसकडून हलवली जात आहेत.
हायलाइट्स:
- राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान सन्मान संमेलन
- राहुल गांधी यांच्या कार्यक्रमात पटोले अलिप्त
- प्रदेशाध्यक्ष-विरोधी पक्षनेत्यांमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेचची चर्चा
राज्यात आघाडीची सत्ता येईल, असा काँग्रेस व मित्रपक्षाच्या नेत्यांचा दावा आहे. बऱ्याच नेत्यांना आतापासून मुख्यमंत्रिपदाचे वेध लागले आहेत. काँग्रेसमध्ये दावेदारांची यादी कमी नाही. विरोधी पक्षनेते हे ‘शॅडो’ मुख्यमंत्री मानले जातात. त्यामुळे वडेट्टीवार समर्थक अधिक सक्रिय आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही अनेक वर्षांपासून या पदाच्या प्रतीक्षेत आहेत. यातून काँग्रेसमध्ये गटबाजी व छुपे द्वंद्व समोर आल्याची चर्चा आहे.
चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांना पदावरून हटवण्याच्या निर्णयावर दीड वर्षापूर्वी नाना पटोले व विजय वडेट्टीवार यांच्यातील वाद बराच गाजला. वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी यानुषंगाने बैठका झाल्या होत्या. पटोले यांनी बंद खोलीत निर्णय करू, असे सांगताच, बंद खोलीत निर्णय करण्याइतका मोठा नेता कुणी नाही, असा पलटवार वडेट्टीवार यांनी केला होता, हे विशेष.