भांडुप-शिवडी ठरलेलं, माहीम कुठून आलं? शिंदेंचा दावा, ‘नंतर बघू’मुळे अमित ठाकरे संकटात

Amit Thackeray : तिहेरी लढतीत शिवसेना किंवा मनसे यांचा वरचष्मा राहू शकतो आणि अमित ठाकरेंना अधिक संधी असल्याचं खुद्द आमदार सदा सरवणकर यांचं म्हणणं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : अमित ठाकरे भांडुपमधून विधानसभा निवडणूक लढवणार होते, म्हणून आम्ही तीच गोष्ट धरुन चाललो होतो. ते अचानक माहीममधून उतरले, तोपर्यंत आमची तयारी झाली होती, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. माहीमची लढत दुहेरी झाली असती, तर अमित ठाकरेंना पराभवाचा धक्का बसला असता. मात्र तिहेरी लढतीत शिवसेना किंवा मनसे यांचा वरचष्मा राहू शकतो आणि अमित ठाकरेंना अधिक संधी असल्याचं खुद्द आमदार सदा सरवणकर यांचं म्हणणं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

शिवडीत बाळा नांदगावकर यांच्या विरोधात आम्ही उमेदवार उभा केलेला नाही. भांडुपबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी आमचं बोलणं झालं होतं. राज ठाकरे म्हणाले होते, की अमित ठाकरे भांडुपमधून निवडणूक लढवतील. त्यामुळे आम्ही तीच गोष्ट डोक्यात ठेवली. मी त्यांच्याशी बोललो होतो आणि त्यांची रणनीती काय आहे हे विचारले होते. पण त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आधी महायुतीसाठी गोष्टी ठरवा मग बघू. मात्र नंतर त्यांनी थेट उमेदवार जाहीर केले, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
Bharti Kamdi : उद्धव ठाकरेंना मोठा हादरा, लोकसभेला ४ लाख मतं घेणाऱ्या उमेदवाराचा जय महाराष्ट्र! शिवसेनेत प्रवेश

…तर अमित ठाकरेंना धक्का असता

मी आमचे माहीमचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांच्याशी बोललो. त्यांनी मला सांगितले की जर ठाकरेंचा उमेदवार आणि मनसे यांच्यात थेट लढत झाली तर अमित माहीममधून जिंकू शकत नाहीत; पण तिरंगी लढत झाली तर दोघांपैकी एक जिंकेल आणि अमित ठाकरेंना संधी आहे. मी सरवणकर यांना राज ठाकरेंना भेटायला सांगितलं होतं, पण राज भेटले नाहीत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath Shinde : भांडुप-शिवडी ठरलेलं, माहीम कुठून आलं? शिंदेंनी ‘राज’की बात सांगितली, ‘नंतर बघू’मुळे अमित ठाकरे संकटात

Uddhav Thackeray : राज ठाकरेंच्या मदतीची परतफेड होणार? उद्धव काकांनी ठरवलं! अमित ठाकरेंच्या बाबत मोठा निर्णय

भाजपचा कुणाला पाठिंबा?

माहीममध्ये महायुतीकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर पुन्हा रिंगणात उतरले आहेत. सरवणकरांवर माघारीसाठी भाजपकडून प्रचंड दबाव आल्याचं पाहायला मिळालं, मात्र त्यानंतरही ते मागे हटले नाहीत. त्यामुळे शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट विरुद्ध मनसे अशी तिरंगी लढत आता निश्चित आहे. भाजपने आपला पाठिंबा महायुतीतील शिवसेनेला जाहीर केला असला, तरी छुपी ताकद अमित ठाकरेंच्या पाठीशी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Amit ThackerayEknath Shinderaj thackeraysada sarvankarVidhan Sabha Nivadnukअमित ठाकरे विधानसभाएकनाथ शिंदे टाईम्स ऑफ इंडिया मुलाखतएकनाथ शिंदे राज ठाकरेराजकीय बातम्यासदा सरवणकर माहीम विधानसभा
Comments (0)
Add Comment