Box Office Collection : अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’ने बॉक्स ऑफिसवर बंपर सुरुवात केली होती, पण पहिल्या दिवसानंतर त्याची कमाई दररोज घसरत आहे. सहा दिवसांत पहिल्यांदाच तो ‘भूल भुलैया ३’ पेक्षा मागे पडला आहे.
हायलाइट्स:
- ‘सिंघम अगेन’ला सहाव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर मोठा धक्का
- पहिल्यांदाच ‘भूल भुलैया ३’ पेक्षा कमाई कमी
- ४०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाची जगभरातील कमाईही मंदावली.
‘सिंघम अगेन’मध्ये अजय देवगण आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यात रणवीर सिंगसह टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण, अर्जुन कपूर, अक्षय कुमार आणि सलमान खान यांचा कॅमिओ देखील आहे. एवढी मोठी तगडी स्टारकास्ट तसेच ब्लॉकबस्टर ‘सिंघम फ्रँचायझी’चा चित्रपट असूनही, ‘सिंघम अगेन’ची कमाई बुधवारी सुमारे -२६% नी घसरली आहे. मंगळवारी एक दिवस आधी, त्याची कमाई -२२% कमी झाली होती. सोमवारी कमाईत -४९% पेक्षा जास्त घट झाली.
‘सिंघम अगेन’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन
sacnilk च्या अहवालानुसार, ‘सिंघम अगेन’ने बुधवारी देशभरात १०.२५ कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले. एक दिवस आधी मंगळवारी या सिनेमाने १४.०० कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. तर सोमवारी १८.०० कोटी रुपयांची कमाई झाली. सहा दिवसांत रोहित शेट्टीच्या या चित्रपटाने देशभरात एकूण १६४.०० कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.
‘भूल भुलैया ३’ ने सहा दिवसांत किती कमाई केली?
‘भूल भुलैया ३’शी तुलना करायची झाल्यास, ‘सिंघम अगेन’ एकूण कमाईच्या बाबतीत खूपच पुढे आहे. कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने सहा दिवसांत १४८.५० कोटींचा व्यवसाय केला आहे. तर बुधवारी सहाव्या दिवशी या हॉरर-कॉमेडीने १०.५० कोटींची कमाई केली आहे. इथे समजून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ‘भूल भुलैया ३’चे बजेट १५० कोटी रुपये आहे. त्यामुळे गुरुवारी हा सिनेमा त्याचा नफा कमावण्यास सुरुवात करेल. पण ‘सिंघम अगेन’ अजूनही २३६ कोटींच्या बजेटने मागे आहे.
‘सिंघम अगेन’ जगभरातले कलेक्शन
जगभरातील कलेक्शनच्या बाबतीतही ‘सिंघम अगेन’चा वेग मंदावला आहे. हा चित्रपट सहा दिवसांत जागतिक बॉक्स ऑफिसवर २५० कोटींचा पल्ला गाठू शकलेला नाही. मात्र, गुरुवारी हा आकडा नक्कीच पार करेल. पहिल्या आठवड्यात ‘सिंघम अगेन’ देशात १७५ कोटी आणि जगभरात सुमारे २५५ कोटी रुपयांचा व्यवसाय करु शकतो असा एकूण अंदाज आहे.
‘भूल भुलैया ३’ ने ‘सिंघम अगेन’ला दिला डच्चू, ६ व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची भरारी
‘सिंघम अगेन’ची कमाई गुजरात आणि मुंबईत घसरली
‘सिंघम अगेन’च्या कमाईत सातत्याने घट होण्याचे मुख्य कारण म्हणजे दिवाळी फेवर आता संपत आहे. गेल्या काही दिवसांत चित्रपटाने चांगली कामगिरी केलेल्या गुजरातमध्ये बुधवारी सुट्ट्यांचे दिवस संपले. याशिवाय मुंबईमध्येही मोठी घसरण दिसून आली आहे. मात्र, येथील कलेक्शन ‘भूल भुलैया ३’ पेक्षा खूपच चांगले आहे.