Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘भूल भुलैया ३’ ने ‘सिंघम अगेन’ला दिला डच्चू, ६ व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची भरारी

9

Box Office Collection : अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’ने बॉक्स ऑफिसवर बंपर सुरुवात केली होती, पण पहिल्या दिवसानंतर त्याची कमाई दररोज घसरत आहे. सहा दिवसांत पहिल्यांदाच तो ‘भूल भुलैया ३’ पेक्षा मागे पडला आहे.

हायलाइट्स:

  • ‘सिंघम अगेन’ला सहाव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर मोठा धक्का
  • पहिल्यांदाच ‘भूल भुलैया ३’ पेक्षा कमाई कमी
  • ४०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाची जगभरातील कमाईही मंदावली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई– रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सच्या ‘सिंघम अगेन’ला मोठा धक्का बसला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या या सिनेमाने बॉक्सऑफिसवर धमाकेदार सुरूवात केली होती. पण आता या सिनेमाची जादू ओसरु लागली आहे. विशेष म्हणजे बुधवारी हा सिनेमा अनीस बज्मीच्या हॉरर-कॉमेडी ‘भूल भुलैया ३’पेक्षा मागे पडला आहे. हे दोन्ही चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर १ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाले. कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने ‘सिंघम अगेन’ला मागे टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र, एकूण कमाईत सिंघम अगेन अजूनही ‘भूल भुलैया ३’ च्या पुढे आहे. मात्र व्यवसायाच्या गतीमध्ये तो मागे पडला आहे. जर परिस्थिती अशीच राहिली तर ४०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट मोतीमोल होऊ शकतो.

‘सिंघम अगेन’मध्ये अजय देवगण आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यात रणवीर सिंगसह टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण, अर्जुन कपूर, अक्षय कुमार आणि सलमान खान यांचा कॅमिओ देखील आहे. एवढी मोठी तगडी स्टारकास्ट तसेच ब्लॉकबस्टर ‘सिंघम फ्रँचायझी’चा चित्रपट असूनही, ‘सिंघम अगेन’ची कमाई बुधवारी सुमारे -२६% नी घसरली आहे. मंगळवारी एक दिवस आधी, त्याची कमाई -२२% कमी झाली होती. सोमवारी कमाईत -४९% पेक्षा जास्त घट झाली.

बिग बॉसचा होस्ट तडकाफडकी बदलला, सलमानऐवजी एकता कपूर सांभाळणार सूत्रसंचालनाची धूरा
‘सिंघम अगेन’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन

sacnilk च्या अहवालानुसार, ‘सिंघम अगेन’ने बुधवारी देशभरात १०.२५ कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले. एक दिवस आधी मंगळवारी या सिनेमाने १४.०० कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. तर सोमवारी १८.०० कोटी रुपयांची कमाई झाली. सहा दिवसांत रोहित शेट्टीच्या या चित्रपटाने देशभरात एकूण १६४.०० कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.

‘भूल भुलैया ३’ ने सहा दिवसांत किती कमाई केली?

‘भूल भुलैया ३’शी तुलना करायची झाल्यास, ‘सिंघम अगेन’ एकूण कमाईच्या बाबतीत खूपच पुढे आहे. कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने सहा दिवसांत १४८.५० कोटींचा व्यवसाय केला आहे. तर बुधवारी सहाव्या दिवशी या हॉरर-कॉमेडीने १०.५० कोटींची कमाई केली आहे. इथे समजून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ‘भूल भुलैया ३’चे बजेट १५० कोटी रुपये आहे. त्यामुळे गुरुवारी हा सिनेमा त्याचा नफा कमावण्यास सुरुवात करेल. पण ‘सिंघम अगेन’ अजूनही २३६ कोटींच्या बजेटने मागे आहे.

व्हाइट हाऊस चाखणार भारतीय मेजवानी? डोनाल्ड ट्रम्प यांनीच दिलेलं वचन, इंडियन शेफची पोस्ट व्हायरल
‘सिंघम अगेन’ जगभरातले कलेक्शन

जगभरातील कलेक्शनच्या बाबतीतही ‘सिंघम अगेन’चा वेग मंदावला आहे. हा चित्रपट सहा दिवसांत जागतिक बॉक्स ऑफिसवर २५० कोटींचा पल्ला गाठू शकलेला नाही. मात्र, गुरुवारी हा आकडा नक्कीच पार करेल. पहिल्या आठवड्यात ‘सिंघम अगेन’ देशात १७५ कोटी आणि जगभरात सुमारे २५५ कोटी रुपयांचा व्यवसाय करु शकतो असा एकूण अंदाज आहे.

‘भूल भुलैया ३’ ने ‘सिंघम अगेन’ला दिला डच्चू, ६ व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची भरारी

‘सिंघम अगेन’ची कमाई गुजरात आणि मुंबईत घसरली

‘सिंघम अगेन’च्या कमाईत सातत्याने घट होण्याचे मुख्य कारण म्हणजे दिवाळी फेवर आता संपत आहे. गेल्या काही दिवसांत चित्रपटाने चांगली कामगिरी केलेल्या गुजरातमध्ये बुधवारी सुट्ट्यांचे दिवस संपले. याशिवाय मुंबईमध्येही मोठी घसरण दिसून आली आहे. मात्र, येथील कलेक्शन ‘भूल भुलैया ३’ पेक्षा खूपच चांगले आहे.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे.तसेच माझी सहेली मॅगझिन मध्ये १ वर्षाचा अनुभव
आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. मनोरंजनसोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.