Chandrakant Bawankule on Uddhav Thackeray Vachannama: शिवसेना (उबाठा) उद्धव ठाकरे यांनी आपला वचननामा जाहीर केला आहे. त्यांच्या या वचननाम्यावर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे.
हायलाइट्स:
- घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही
- नेता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो
- उद्धव ठाकरेंच्या वचननाम्यानंतर विरोधकांचा हल्लाबोल
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
”अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’त बसून उबाठा गटाचा वचननामा प्रकाशित केला. उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही. बाळासाहेबांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राचं हित. तर उद्धव ठाकरेंच्या समोर फक्त कुटुंब. उद्धवजी नेता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो”, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीटवर (एक्स) उद्धव ठाकरेंना लगावला.
”हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आतापर्यंत प्रत्येक वचननामा शिवसेना भवनात प्रकाशित केला. कारण त्यांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राचं हित होतं. पण सच्चा शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त कुटुंबचं आहे. उद्धवजी नेता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो” असं म्हणत बावनकुळेंनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरेंच्या वचननाम्यात काय काय?
१. धारावी पुनर्विकासाआडून बकालपणाचा सरकारचा डाव हाणून पाडणार.
२. मुंबई आणि महाराष्ट्रराचं नवे गृहनिर्माण धोरण ठरवणार.
३. कोळीवाड्यांचा क्लस्टर जीआर रद्द करणार.
४. राज्यातील बेरोजगारी हटवणार.
६. राज्यातील भूमिपूत्रांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देणार.
७. मुलींप्रमाणे मुलांनांही मोफत शिक्षण देणार.
८.जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार.