उमेदवारांच्या खर्चावर आयोगाचा ‘वॉच’; मतदानाच्या दिवसापर्यंत उमेदवारांना ३ वेळा सादर करावा लागणार हिशेब

Maharashtra Assembly Election 2024: शहरातील तीनही मतदारसंघांमधील उमेदवारांच्या खर्च तपासणीला गुरुवार (दि. ७) पासून, तर देवळालीतील खर्च तपासणीला उद्या (दि. ८) पासून सुरुवात होणार आहे.

हायलाइट्स:

  • ७, १२ व १७ नोव्हेंबर रोजी खर्चाची तपासणी
  • उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहणे गरजेचे
  • मूळ कागदपत्रांची होणार तपासणी
महाराष्ट्र टाइम्स
election fund

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या जाहीर प्रचाराने जोर धरला आहे. गल्लोगल्ली प्रचार रथ फिरत असून, नेत्यांच्या जाहीर सभांनाही सुरुवात झाली आहे. उमेदवारांना प्रचारावर होणाऱ्या खर्चाचा हिशेब द्यावा लागणार असून, खर्च निरीक्षकांद्वारे आजपासून खर्चाच्या तपासणीला सुरुवात होणार आहे. शहरातील तीनही मतदारसंघांमधील उमेदवारांच्या खर्च तपासणीला गुरुवार (दि. ७) पासून, तर देवळालीतील खर्च तपासणीला उद्या (दि. ८) पासून सुरुवात होणार आहे.नाशिक मध्य, नाशिक पूर्व आणि नाशिक पश्चिम या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या तपासणीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ७, १२ व १७ नोव्हेंबर रोजी उमेदवारांच्या खर्चाची तपासणी होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी १ आणि दुपारी २ ते सायंकाळी ६ या दोन सत्रांत शासकीय विश्रामगृहात निरीक्षकांकडून ही तपासणी केली जाणार आहे. उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहून खर्चाचा हिशेब द्यावा लागणार आहे. उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रदान केलेल्या ओळखपत्रासह, अभिलेखे, खर्चाचे रजिस्टर, मूळ प्रमाणके, अद्ययावत बँक पासबुक/ स्टेटमेंटसह निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय व सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेली परवानगी पत्रे घेऊन वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केले आहे.
Chhatrapati Sambhajinagar: गर्लफ्रेण्डसोबत पळाला, मग खुनी खेळ, या बॉयफ्रेण्डचा कारनामा पाहून पोलीसही हादरले
देवळाली मतदारसंघात उद्या खर्च तपासणीदेवळाली विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या तपासणीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ८, १३ व १८ नोव्हेंबर रोजी उमेदवारांच्या खर्चाची तपासणी करण्यात येणार आहे. सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत शासकीय विश्रामगृह येथे ही तपासणी होणार आहे.

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

devlali vidhan sabhamaharashtra assembly election 2024Maharashtra vidhan sabha nivadnukNashik Vidhan Sabhaनाशिक बातम्यानिवडणूक आयोगविधानसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment