Sanjay Raut on Batenge to Katenge : सत्तेसाठी आणि निवडणुकीसाठी भाजपला बटेंगे तो कटेंगेच्या घोषणा द्याव्या लागत आहेत, हे दुर्दैव असल्याचंही यावेळी संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटमध्ये ‘बटेंगे तो…’च्या पुढचं सांगायला पाहिजे. त्यांनी आमचा पक्ष वाटला – बटेंगे… राष्ट्रवादी काँग्रेस वाटला – बटेंगे… भविष्यात सत्ता गेल्यावर हीच वेळ त्यांच्यावरही येणार आहे. बटेंगे.. झुकेंगे.. नष्ट होंगे हे त्यांचं प्राक्तन आहे, पक्षाचं भविष्य आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
योगींचे चार भाऊ ४० वर्षात एकत्र आले नाहीत
योगी आदित्यनाथ यांच्या संदर्भात बटेंगे तो कटेंगे असे पोस्टर मुंबईत लावले जात आहेत, याचं मला आश्चर्य वाटतं. कारण योगी आदित्यनाथ यांना चार भाऊ आहेत आणि गेल्या ४० वर्षात चार भाऊ एकत्र आलेले नाहीत. अनेक वर्ष योगी आपल्या आईला भेटू शकले नाहीत.. तिथेही बटेंगे. योगी आपल्या वडिलांच्या अंत्ययात्रेला जाऊ शकले नाहीत… तिथेही बटेंगे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
Sanjay Raut : योगींना चार भाऊ पण ४० वर्षात एकत्र आले नाहीत, वडिलांच्या अंत्यविधींना गेले नाहीत, तिथेही बटेंगे; संजय राऊत यांचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी बटेंगे तो कटेंगेच्या घोषणा
हे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून आम्हाला बटेंगे-कटेंगे-छटेंगे आम्हाला शिकवतात. ज्या भाजपने आयु्ष्यभर देशात बटेंगेचं राजकारण केलं, त्यांना आता सत्तेसाठी, निवडणुकीसाठी बटेंगे तो कटेंगेच्या घोषणा द्याव्या लागत आहेत, हे दुर्दैव आहे. आम्ही राष्ट्र, समाज एकत्र ठेवण्यासाठी संघर्ष करतोय आणि ते बटेंगे तो कटेंगेची भाषा करत आहेत हे दुर्दैव असल्याचंही संजय राऊत म्हणाले.