आमच्याशी लढा, घरातील महिलांवर आरोप नकोत, सुप्रिया सुळे फडणवीसांवर भडकल्या

Supriya Sule Slams Devendra Fadnavis: राजदीप सरदेसाई यांच्या एका पुस्तकाने महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप आला आहे. यामध्ये अनेक धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. यात भाजपने कशा प्रकारे पक्ष फोडले, याचाही उल्लेख करण्यात आला आहे.

हायलाइट्स:

  • राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात मोठे दावे
  • सुप्रिया सुळे देवेंद्र फडणवीसांवर भडकल्या
  • सुनेत्रा पवारांचं नाव आल्याने सुप्रिया सुळेंचा संताप
महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुणे: २०२४: द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया पुस्तकाने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या पुस्तकात अनेक धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. यावर आता सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलीच आगपाखड केली. यावेळी सुप्रिया सुळे चांगल्याच संतापलेल्या पाहायला मिळाल्या. या पुस्तकात अनेक धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. त्यावरुन सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना ऐकवलं आहे. त्यांनी पत्रकारांशी बोलताना वृत्तपत्रात आलेल्या या पुस्तकाच्या बातमीचा उल्लेख करत सांगितलं की, राजदीप सरदेसाई यांनी हे पुस्तक लिहिलंय, त्यात एक मोठा दावा केला आहे. हा एक गंभीर विषय आहे, ज्याबद्दल मी नेहमी बोलत आली आहे. यंत्रणांचा वापर करुन विरोधा पक्ष फोडणे, घरं फोडणे हे पाप आणि असंवैधानिक गोष्टी सातत्याने अदृश्य शक्ती करत आहेत. हे मी वारंवार बोलते आहे.
Sanjay Raut : योगींना चार भाऊ पण ४० वर्षात एकत्र आले नाहीत, वडिलांच्या अंत्यविधींना गेले नाहीत, तिथेही बटेंगे; संजय राऊत यांचा हल्लाबोल
कश्मीर-कन्याकुमारी ९५ टक्के केसेस ईडी, आयटी आणि सीबीआयच्या विरोधी पक्षावर आहेत. त्याचा उल्लेख या पुस्तकात केला आहे. ज्या लोकांवर आरोप केलेत त्याच लोकांना वॉशिंग मशीनमध्ये टाकून भाजप सत्त स्थापन करते, हे या पुस्तकातही म्हटलं गेलं आहे.

या पुस्तकात अनेक गोष्टी आहेत. मला दु:ख एकाच गोष्टीचं झालं. यात पुरुषांचा उल्लेख झाला, पण त्यात महिलांचाही उल्लेख झाला. अदृश्य शक्ती ही फक्त पुरुषांच्याच नाही तर महिलांच्याही मागे आहे. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे माझ्या तीन बहिणींवर आयटीची रेड. पाच दिवस ही रेड चालली. रजनी इंदुलकर, मीता पाटील आणि विजया पाटील या तिघींच्या घरी रेड टाकली.

छगन भुजबळ, संजय राऊत, नबाव मलिक, अनिल देशमुख यांचे कुटुंब कशातून गेले हे मला माहिती आहे. मला फडणवीसांना विचारायचं आहे की, जेव्हा आर आर पाटलांवर आरोप झाले त्या फाइलवरील फायनल इन्क्वायरी कोणी लावली. तर ती फडणवीसांनीच लावली. त्यांची मुख्यमंत्री म्हणून सही आहे. त्याच केसमध्ये, त्याच फाइलवर ज्यांच्या विरोधात फडणवीस होते, त्या अजित पवारांना बोलावून ती फाइल दाखवली. हा गुन्हा आहे, त्यांच्यावर खटला भरला पाहिजे. त्यांनी राज्याला फसवलं आहे.

फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना ज्यांच्यावर आरोप केले. ज्यांच्यावर चौकशी सुरु केली, मुख्यमंत्री असताना चौकशी सुरु केली. मग त्यांना घरी बोलावून घेतलं. एकतर फाइल घरी आणली कशी, आणली तर ज्यांच्यावर आरोप केले त्यांना दाखवली कशी याची उत्तरं फडणवीसांना द्यावं लागेल.

Supriya Sule: सरदेसाईंच्या पुस्तकाने भूकंप; सुनेत्रा पवारांचं नाव कशाला, सुप्रिया सुळे भडकल्या, फडणवीसांवर आगपाखड

या पुस्तकात सुनेत्रा पवारांचंही नाव आहे. यात सुनेत्रा पवारांचं नाव आणायची काय गरज होती. यात महिलांना का आणताय. तुमची लढाई राजकीय आहे तर आमच्याशी लढा आमच्या घरातील महिलांवर का आरोप करताय. आमच्या घरातल्या महिलांवर हल्ले करताय, असं म्हणत सुप्रिया सुळे चांगल्याच संतापलेल्या दिसल्या.

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

2024: the election that surprised indiarajdeep sardesai bookSharad Pawarsunetra pawarsupriya sule slams devendra fadnavisअजित पवारछगन भुजबळदेवेंद्र फडणवीसराजदीप सरदेसाई पुस्तकसुप्रिया सुळे बातम्या
Comments (0)
Add Comment