मुंबईहून लग्नासाठी निघाले, महामार्गावर पहाटेच्या वेळी अनर्थ; कारचा चक्काचूर; बाप-लेकाचा दुर्दैवी अंत

Beed Car Accident : मुंबईहून निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, पाडळशिंगीजवळ अपघातात पिता – पुत्र यांचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले आहेत. अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दीपक जाधव, बीड : धुळे – सोलापूर महामार्गावर शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान बीडकडे जाणाऱ्या कारला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक देऊन तेथून पळ काढला. हा अपघात इतका भीषण होता, की अपघातामध्ये कारमधीलतील दोन जण जागीच ठार झाले. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना ८ नोव्हेंबर रोजी पाडळशिंगीजवळ टोलनाक्यापासून काही अंतरावर घडली. या अपघातानंतर या मार्गावर मोठी गर्दी जमली होती.

मुंबईहून बीडला निघालेले कुटुंबिय

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नातेवाईकांकडे लग्नासाठी निघालेल्या, मुंबईहून बीडकडे येणाऱ्या एम एच ०३ डीजे ८९४४ या चार चाकी कारला धुळे – सोलापूर या महामार्गावर अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात वडील आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला असून, तिघे जण जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की, एका मृताचा मृतदेह छिन्नविछिन्न झाला होता. ही दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी सहा वाजता पाडळशिंगीच्या टोलनाक्याजवळ घडली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
योगी आदित्यनाथ यांच्या सभास्थळाहून परतताना पोलीस कर्मचाऱ्यासोबत घडला अनर्थ; कुटुंबावर दु:खाचा डोंगर
सय्यद हमीद (वय ७० वर्षे रा. मुंबई) यांच्या नातेवाईकांचं १० नोव्हेंबर रोजी बीड येथे लग्न होतं. या लग्नानिमित्ताने ते आपल्या कुटुंबियांसह चारचाकी गाडीने बीडकडे येत होते. सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान पाडळशिंगी टोलनाक्याजवळ त्यांच्या गाडीला पाठीमागून अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली.
Shah Rukh Khan ला जीवे मारण्याची धमकी प्रकरणात मोठा ट्विस्ट, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

कारचा चक्काचूर, दोघांचा जागीच मृत्यू

या अपघातात सय्यद हमीद (वय ७० वर्षे) आणि त्यांचा मुलगा सय्यद मुदस्सीर (वय ३५ वर्षे, रा. अंधेरी, मुंबई) हे दोघे जागीच ठार झाले, तर गाडीतील इतर ३ जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये लहान मुलांचा आणि दोन महिलांचा समावेश आहे. अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला आहे.

मुंबईहून लग्नासाठी निघाले, महामार्गावर पहाटेच्या वेळी अनर्थ; कारचा चक्काचूर; बाप-लेकाचा दुर्दैवी अंत

त्यातील एका मृताचा मृतदेह छिन्नविछिन्न झाला होता. जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

Beedbeed accident newsbeed car accident 2 diedbeed solapur road car accidentधुळे सोलापूर मार्गावर अपघात बीडबीड अपघात बातमीबीड कार अपघात दोन ठार
Comments (0)
Add Comment