Chhagan Bhujbal Book Interview: राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरुय. याच निवडणुकीच्या धामधुमीत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी एका पुस्तकात केलेल्या दाव्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
हायलाइट्स:
- सुनेत्रा पवारांना अटक ते राष्ट्रवादी का फुटली?
- छगन भुजबळांच्या दाव्याने राजकारण हादरलं
- राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात महत्त्वाचे खुलासे
काय आहेत पुस्तकात छगन भुजबळांचे दावे?
१. भाजपबरोबर सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद सर्वांना झाला. कारण अर्थातच ईडीपासून सुटका.
२. माझ्यासाठी तर ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता.
३. मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या
४. उच्च जातीचा असतो तर मला असे वागवले नसते
५. दोन-अडीच वर्षे तुरुंगात राहूनही ईडीची पुन्हा नोटीस आली. वयाच्या पंचाहत्तरीत कितीवेळा चौकशांना सामोरे जायचं.
६. तुरुंगात असताना भाजपात आलात तरच सुटका होईल, असं अनिल देशमुखही म्हणतात.
७. अजूनही तुरुंगातील दिवस आठवले की माझी झोप उडते
८. आता या वयातही ईडी माझा पिच्छा सोडायला तयार नाही.
९. पंतप्रधान मोदी वा भाजपबरोबर हातमिळवणी केल्याशिवाय सुटका नाही ही साऱ्यांचीच भावा होती.
१०. शरद पवारांना हे सारे समजत होते. पण ते भाजपबरोबर जाण्यास अनुकूल नव्हते.
११. भाजपबरोबर गेल्याने ईडीच्या जाचापासून साऱ्यांची सुटका झाली.
१२. कदाचित सुनेत्रा पवारांना अटक होऊ शकते, हे कळले तेव्हा अजितदादांनाही घाम फुटला होता.
अशा पद्धतीचे अनेक विधानं या पुस्तकात करण्यात आलेले आहेत. राष्ट्रवादी का फुटली? शरद पवारांचे असलेले निकटवर्तीय सहकारी एकत्र का आले? याची सर्व कारणं यात दिलेली आपल्याला पाहायला मिळेल.