Amla Navami Upay For Money : धार्मिक मान्यतेनुसार अक्षय नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडावर भगवान विष्णू आणि भगवान शिव वास करतात. शास्त्रानुसार अक्षय नवमीच्या दिवशी केलेले शुभकर्म उत्तम फल देते. या दिवशी काही विशेष उपाय केल्यास धनाची प्राप्ती होते आणि आरोग्य निरोगी राहते.
कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला ‘आमला नवमी’ किंवा ‘अक्षय नवमी’ म्हणून साजरी केली जाते. पंचांगानुसार यंदा कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची नववी तिथी ९ नोव्हेंबरला रात्री १०.४५ वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी १० नोव्हेंबरला रात्री ९:०१ वाजता समाप्त होईल.
१० नोव्हेंबर रोजी आवळा नवमी साजरी होणार आहे. या दिवशी आवळा वृक्षाची पूजा केली जाते आणि कुटुंबाला आरोग्य, सुख आणि समृद्धी लाभावी अशी प्रार्थना केली जाते. या दिवशी केलेली तपश्चर्या, जप, दान इत्यादी केल्याने मनुष्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते.
धार्मिक मान्यतेनुसार अक्षय नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडावर भगवान विष्णू आणि भगवान शिव वास करतात. शास्त्रानुसार अक्षय नवमीच्या दिवशी केलेले शुभकर्म उत्तम फल देते. या दिवशी काही विशेष उपाय केल्यास धनाची प्राप्ती होते आणि आरोग्य निरोगी राहते.
आवळ्याच्या झाडाची पूजा
धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली पूजा केल्याने भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यासाठी सर्वात आधी आवळ्याच्या झाडाला गंगाजल शिंपडून शुद्ध करा. झाडाभोवती तुपाचा दिवा लावून त्याची पूजा करा. त्यानंतर हार फुले अर्पण करुन प्रदक्षिणा घालून जल अर्पण करा. असे केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि जीवनात सुख-समृद्धी नांदते.
आवळ्याच्या झाडाखाली अन्न ग्रहण
असे म्हटले जाते की, आवळ्याच्या झाडाखाली बसून अन्न ग्रहण केल्याने शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होते. असे केल्याने घरात सुख आणि आर्थिक समृद्धी येते. आवळा हा भगवान विष्णूंचा प्रिय आहे आणि त्याचे सेवन केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळतो.
गरीब आणि ब्राह्मणांना जेवू घाला
या दिवशी गरीब, गरजू किंवा ब्राह्मणांना अन्नदान केल्याने पुण्य प्राप्त होते. तसेच देवी लक्ष्मी प्रसन्न होते. या दिवशी दान केल्याने धनसंपत्ती वाढ होते. तसेच घरात कधीही अन्न आणि पैशांची कमतरता भासत नाही अशी धार्मिक मान्यता आहे.
आवळ्याच्या झाडाखाली नाणे अर्पण करा
आवळा नवमीला आवळा झाडाच्या मुळाशी नाणे पुरणे शुभ मानले जाते. असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारते आणि देवी लक्ष्मी घरात वास करते.