Parbhani CM Eknath Shinde Sabha: देशामध्ये ही पहिली घटना असेल की सरकारच्या योजना चोरायच्या आणि जनतेसमोर जायचे. आमचे सरकार पैसे काढून घेणारे सरकार नसून पैसे देणारे सरकार” असल्याचंही एकनाथ शिंदे म्हणाले.
हायलाइट्स:
- लाडक्या बहिणींसाठी आणि शेतकऱ्यांसाठी मी १०० वेळा जेलमध्ये जाईल
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विरोधकांच्या धमक्यांना उत्तर
- परभणीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधकांवर बरसले
https://www.youtube.com/live/njCKkiK3p6k?si=dOb4Gzspywyd6lPa
”आम्ही मालक नसून जनतेचे सेवक आहोत महाविकास आघाडीचे लोक स्वतःला मालकासारखे समजून वागतात असा घणाघातही केला. आम्ही शेतकऱ्यांचे वीजबिल माफ केले, आता आमचे सरकार आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील आम्ही करणार आहोत. मी सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलो आहे. मला काम करण्याची संधी मिळाली आणि त्यामुळेच मी माझ्या लाडक्या बहिणींना मदत केली. त्याचबरोबर लाडक्या भावांना आणि शेतकऱ्यांनाही भरघोस मदत केली”.
आनंद भरोसेवर भरोसा म्हणजे एकनाथ शिंदेवर भरोसा
”परभणी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणारे आनंद भरोसे हे भरवशाचे आहेत. आनंद भरोसे यांच्यावर भरोसा म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भरोसा असाच आहे. आनंद भरोसे हे सर्वांच्या मदतीला धावून जातात त्यांना आपली सेवा करण्यासाठी विधानसभेत पाठवा. येणाऱ्या २० तारखेला त्यांना भरभरून मतदान द्या २३ तारखेला फटाके फोडायला मी स्वतः तुमच्यामध्ये हजर राहील”, असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.