Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

लाडक्या बहिणी अन् शेतकऱ्यांसाठी १०० वेळा जेलमध्ये जाईन, CM शिंदे विरोधकांवर बरसले

9

Parbhani CM Eknath Shinde Sabha: देशामध्ये ही पहिली घटना असेल की सरकारच्या योजना चोरायच्या आणि जनतेसमोर जायचे. आमचे सरकार पैसे काढून घेणारे सरकार नसून पैसे देणारे सरकार” असल्याचंही एकनाथ शिंदे म्हणाले.

हायलाइट्स:

  • लाडक्या बहिणींसाठी आणि शेतकऱ्यांसाठी मी १०० वेळा जेलमध्ये जाईल
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विरोधकांच्या धमक्यांना उत्तर
  • परभणीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधकांवर बरसले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
एकनाथ शिंदे परभणी सभा

धनाजी चव्हाण, परभणी : ”विरोधक आपल्या भाषणामध्ये म्हणत आहेत की आमचे सरकार आल्यास महायुतीच्या सरकारमध्ये सुरू केलेल्या सर्व योजनांची चौकशी करू आणि त्या चौकशीमध्ये दोषी आढळल्यास त्यांना जेलमध्ये टाकू. माझे विरोधकांना आव्हान आहे की तुम्ही चौकशी करा. पण मी ज्या लाडक्या बहिणींसाठी आणि शेतकऱ्यांसाठी योजना सुरू केली आहे. त्या योजनेसाठी मी १०० वेळा जेलमध्ये जावे लागले तरी जाणार. पण या योजना सुरूच ठेवणार. विरोधकांच्या पोकळधमक्यांना मी घाबरणारा नाही”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात कडाडले आहेत.परभणी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने निवडणूक रिंगणात उभे असलेले आनंद भरोसे यांच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परभणी येथे आले आहेत. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार हरिभाऊ लहाने, आमदार मेघना बोर्डीकर उमेदवार, आनंद भरोसे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ”मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जेव्हा आम्ही सुरू केली, तेव्हा विरोधक आम्हाला म्हणत होते की, सरकारकडे पैसाच नाही. सरकारने सगळी तिजोरी रिकामी केली आहे आणि ही योजना काही महिनेच चालू राहील. पण आता विरोधकांच्या जाहीरनाम्यातच लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. देशामध्ये ही पहिली घटना असेल की सरकारच्या योजना चोरायच्या आणि जनतेसमोर जायचे. आमचे सरकार पैसे काढून घेणारे सरकार नसून पैसे देणारे सरकार” असल्याचंही एकनाथ शिंदे म्हणाले.
https://www.youtube.com/live/njCKkiK3p6k?si=dOb4Gzspywyd6lPa
Ram Narayan : जागतिक कीर्तीचे सारंगीवादक पद्मविभूषण पं. राम नारायण यांचं निधन, वयाच्या ९७ व्या वर्षी अखेरचा श्वास

”आम्ही मालक नसून जनतेचे सेवक आहोत महाविकास आघाडीचे लोक स्वतःला मालकासारखे समजून वागतात असा घणाघातही केला. आम्ही शेतकऱ्यांचे वीजबिल माफ केले, आता आमचे सरकार आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील आम्ही करणार आहोत. मी सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलो आहे. मला काम करण्याची संधी मिळाली आणि त्यामुळेच मी माझ्या लाडक्या बहिणींना मदत केली. त्याचबरोबर लाडक्या भावांना आणि शेतकऱ्यांनाही भरघोस मदत केली”.

आनंद भरोसेवर भरोसा म्हणजे एकनाथ शिंदेवर भरोसा

”परभणी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणारे आनंद भरोसे हे भरवशाचे आहेत. आनंद भरोसे यांच्यावर भरोसा म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भरोसा असाच आहे. आनंद भरोसे हे सर्वांच्या मदतीला धावून जातात त्यांना आपली सेवा करण्यासाठी विधानसभेत पाठवा. येणाऱ्या २० तारखेला त्यांना भरभरून मतदान द्या २३ तारखेला फटाके फोडायला मी स्वतः तुमच्यामध्ये हजर राहील”, असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.