Aditya Thackeray Nashik: नाशिकच्या प्रचारसभेत मंचावरुन खाली उतरुन आदित्य ठाकरेंनी साधला संवाद…
जनतेशी संवाद,आश्वासनांची खैरात! लाडक्या बहिणीला मविआचा ‘डबल बोनस’
निवडणुकीच्या तोंडावर सभांचे सत्र सुरू असताना आदित्य ठाकरे यांची नाशिक मधील सभा जरा ‘हटके’ ठरली. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे मंचावरून खाली उतरुन थेट जनतेत गेले.
…तर खात्यात १५० रूपये जमा होतील !
“भाजप सरकारने २०१४ साली प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रूपये जमा होतील असं आश्वासन दिले होते.महायुती सरकारने त्याचे १५०० केले,आणि आता जर पुन्हा महायुती सत्तेत आली तर १५०० वरून १५० रूपये खात्यात जमा होतील” असे आदित्य ठाकरे म्हणाले.
आश्वासनांची खैरात
मविआ सत्तेत आल्यास, लाडक्या बहिणीला महागाईची झळ बसू नये म्हणून महायुती सरकारपेक्षा ‘डबल‘ म्हणजे दरमहा ३,००० रूपये खात्यात जमा करण्याचं आश्वासन आदित्य ठाकरे यांनी यावेळी बोलताना दिले.
निवडणूक काळात मतदारांवर आश्वासनांच्या खैरातीचा वर्षाव होत असतो . अनेक योजना याच काळात जन्माला येतात आणि सत्तेची पाच वर्ष पूर्ण होत येतानाच प्रत्यक्षात आणल्या जातात (?).
आता कोण सत्तेत येणार आणि कोण आपली वचनं पाळणार हे येणारा काळच ठरवणार.