शरद पवारांचं मिशन नाशिक; १२ नोव्हेंबरला जिल्ह्यात सहा जाहीर सभा, असा असेल दौरा…

Sharad Pawar Sabha In Nashik: शरद पवार हे १२ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात एकाच दिवशी सहा जाहीर सभा घेणार आहेत.

महाराष्ट्र टाइम्स
sharad pawar ncp

म.टा.विशेष प्रतिनिधी, नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून अजित पवार गटात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील नाशिक आमदारांविरोधात प्रचार करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरणार आहेत. शरद पवार हे १२ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात एकाच दिवशी सहा जाहीर सभा घेणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेपाठोपाठ महाविकास आघाडीच्या जाहीर सभाही होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना घेरण्यासाठी पवार यांनी १२ नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी लागोपाठ सहा सभांचे नियोजन केले आहे. त्यात येवल्यात मंत्री छगन भुजबळ, दिंडोरीत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, कळवणचे आमदार नितीन पवार, सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे, निफाडचे आमदार दिलीप बनकर यांना लक्ष्य केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात त्यांची नाशिक पूर्व मतदारसंघातही सभा होणार आहे.
जीवघेणा ठरला नायलॉन मांजा! मांडीला गंभीर दुखापत, ९ वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू, नाशिकमधील घटना
… असा आहे पवारांचा दौरा
शरद पवारांची साथ सोडणारे कळवणचे आमदार नितीन पवार यांच्या विरोधात आणि ‘माकप’चे उमेदवार जे. पी. गावितांच्या प्रचारासाठी १२ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहाला शरद पवार सभा घेणार आहे. त्यानंतर दिंडोरीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार सुनीता चारोस्करांसाठी त्यांची बारा वाजता सभा होईल. निफाडमधील ठाकरे गटाचे उमेदवार अनिल कदम यांच्यासाठी ते एक वाजता सभा घेतील.
आमच्या योजना बंद होणार नाहीत; Ladki Bahin Yojanaवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मोठं विधान
येवल्यात माणिकराव शिंदे यांच्या प्रचारासाठी तीन वाजता त्यांची सभा होईल. सिन्नरमधील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार उदय सांगळे यांच्यासाठी ते पाच वाजता सभा घेतील. नाशिक पूर्व मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गिते यांच्यासाठी ते साडेसात वाजता सभा घेतील.

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

ajit pawarmaharashtra governmentmanik kokatemva governmentNashik Vidhan SabhaPM ModiSharad Pawarनाशिक बातम्यानाशिक विधानसभा मतदारसंघ
Comments (0)
Add Comment