शाहांचा ठाकरेंवर हल्लाबोल, संजय राऊतांचा पलटवार; काश्मिरमध्ये काय दिवे लावले आम्हाला सगळं…

Sanjay Raut on Amit Shah: ”बाळासाहेबांवर आपलं इतकं प्रेम असतं तर बाळासाहेबांची शिवसेना आपण गैरमार्गाने फोडली नसती. बाळासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय यांचा पक्ष एक इंचशिवाय पुढे सरकत नाही”

हायलाइट्स:

  • अमित शहा खोटं बोलत आहे
  • व्यापारी नेहमी खोटं बोलतो आपल्या फायद्यासाठी
  • संजय राऊतांचा अमित शहांवर हल्लाबोल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
संजय राऊत अमित शहा टीका

मुंबई : ”अमित शहा खोटं बोलत आहे, व्यापारी नेहमी खोटं बोलतो आपल्या फायद्यासाठी. ३७० कलम हटवून कश्मीरमध्ये आपण काय दिवे लावले आहेत, आजही कश्मीरमध्ये आपल्या जवानांच्या हत्या सुरू आहेत. ३७० कलम हटवल्यामुळे ना कश्मीरचा ना देशाचा फायदा झाला. याच्यावर बडबड करणे आवश्यक आहे. काश्मीरमध्ये एकही रोजगार आला नाही. फक्त गौतम अडाणीसाठी जमिनी मोकळ्या केल्या. महाराष्ट्रात चिखल जो केला आहे त्याला जबाबदार अमित शहा आहेत”, असा जोरदार हल्लाबोल शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केला आहे. नेहमीप्रमाणे सकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बाळासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय यांचं…

”बाळासाहेबांवर आपलं इतकं प्रेम असतं तर बाळासाहेबांची शिवसेना आपण गैरमार्गाने फोडली नसती. बाळासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय यांचा पक्ष एक इंचशिवाय पुढे सरकत नाही. तुमच्यापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची लोकं अधिक चांगली आहेत. त्यांना बाळासाहेबांविषयी अत्यंत आदर आहे. त्यांचं तुमच्यासारखं ढोंगी प्रेम नाहीय. आम्ही सातत्याने सांगत आहोत की वीर सावरकरांना भारतरत्न द्या, हे का देत नाही? कारण त्यांना भारतरत्न देणं हे अमित शहांच्या हातात आहे. ते ३७० कलम हटवण्यात स्वतःची पाठ थोपटून घेऊ शकतात. मैंने हटाया, मैंने हटाया, मग द्याना त्यांना भारतरत्न तुम्हाला कोणी अडवलं आहे. तुम्ही तुमच्या पोस्टरवरच्या आणि बॅनरवरच्या बाळासाहेबांचे फोटो काढा लोकं तुम्हाला महाराष्ट्रात उभा करणार नाही, असा टोला देखील राऊतांनी महायुतीला लगावला आहे.
महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? महायुती की मविआ? निवडणुकीपूर्वी निकालाचं सर्वेक्षण, आवडता CM कोण?

सर्वेक्षण अंदाज चुकणार…

दरम्यान, मैटराइजच्या नुकत्याच आलेल्या सर्वेक्षणावर संजय राऊतांना सवाल केला असता ते म्हणाले की, ”जे कोणाचे सर्वे येत आहेत त्याच्यावरती फार विश्वास ठेवावा अशी काही परिस्थिती नाहीय. लोकसभेला देखील सर्वे आले होते की, महाविकास आघाडीला १० जागा देखील मिळणार नाही. पण आम्ही ३१ जागा जिंकलो. महायुतीचे लोक कुठूनही सर्वे करून घेतील आणि लोकांमध्ये भ्रम निर्माण करतील. मी सांगत आहे की आम्हाला १६० ते १६५ जागा मिळणार आहेत. भाजपची लोक चोऱ्या माऱ्या करून ज्या जागा जिंकतात तिथे आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही सावध राहायला सांगितलं आहे. आता जे सरकार आहे चंद्रचूड कृपेने किंवा मोदी शहांच्या कृपेने बसलेले आहे. ते पुन्हा निवडून येणार नाही आहे अशी खात्री आहे”, असा विश्वास देखील राऊतांनी यावेळी दर्शवला.

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

amit shah marathi newsmaharashtra assembly electionsanjay raut amit shah criticisesanjay raut marathi newsअमित शहा मराठी बातम्यामहाराष्ट्र विधानसभा निवडणूकसंजय राऊत अमित शहा टीकासंजय राऊत मराठी बातम्या
Comments (0)
Add Comment