Maharashtra Election 2024: राज्यात नवे सरकार कोणाचे येणार याचा निर्णय २३ तारखेला होणार असला तरी २०१९च्या विधानसभा निवडणुकीतील ३७ अशा जागा आहे येथे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील चुरस वाढेल.
महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांपैकी पाच जागा अशा होत्या ज्यात विजयाचे अंतर १ हजार पेक्षा कमी मतांचे होते. एक जागा तर अशी होती येथे विजयाचे अंतर ५०० पेक्षा कमी होते. हा विजय शिवसेनेच्या भाऊसाहेब लांडे यांनी मिळवला होता. चांदीवली मतदारसंघातून त्यांनी फक्त ४०९ मतांनी विजय मिळवला होता.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोगरा मतदारसंघातून चंद्रिकापुरे गोवर्धन यांनी ७१८ मतांनी विजय मिळवला होता. तर पुण्यातील दौंडमधून राहुल कुल यांनी ७४६ मतांनी बाजी मारली होती. असाच विजय सांगोलामधून शाहजी बापू पाटील यांनी मिळवला होता, त्यांनी ७६८ मतांनी विजय मिळवला. नगरमधील कोपरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशितोष काळे यांनी ८२२ मतांनी बाजी मारली होती.
या शिवाय एक दो दोन हजार मतांच्या फरकाने भिवंडी पूर्व, मूर्तिजापूर, मुक्ताईनगर आणि बीड येथील निकाल लागले होते. या मतदारसंघात भाजप, राष्ट्रवादी, सपा आणि अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. २०१९ साली २८ जागा अशा होत्या येथे विजयाचे अंतर २ ते ५ हजार इतके होते. यातील १२ जागांवर भाजपने, ६ जागांवर राष्ट्रवादी, ४ जागा काँग्रेस, २ जागा शिवसेना तर एआयएमआयएम, बहुजन विकास आघाडी, भाकप यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली होती. एक जागा अपक्ष उमेदवाराला मिळाली होती.
निवडणुकीत ३१ जागा अशा होत्या येथे विजयाचे अंतर ५ हजार पेक्षा कमी होते. या ३१ पैकी १६ मतदारसंघात माहविकास आघाडीने लीड घेतले होते तर १५ जागांवर महायुतीला आघाडी मिळाली होती. या निकालाकडे पाहिले तर ३७ जागांवर कोण बाजी मारणार यावर सत्ता कोणाला मिळेल याचा फैसला होऊ शकतो.