आजचे पंचांग 12 नोव्हेंबर 2024: कार्तिक एकादशी, विष्णुप्रबोधोत्सव ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 12 November 2024 in Marathi: मंगळवार १२ नोव्हेंबर २०२४, भारतीय सौर २१ कार्तिक शके १९४६, कार्तिक शुक्ल एकादशी सायं. ४-०५ पर्यंत, चंद्रनक्षत्र: पूर्वा भाद्रपदा सकाळी ७-५१ पर्यंत, उत्तरा भाद्रपदा उत्तररात्री ५-३९ पर्यंत, चंद्रराशी: मीन,सूर्यनक्षत्र: विशाखा

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति कार्तिक ११, शक संवत १९४६, कार्तिक शुक्ल एकादशी, मंगळवार, विक्रम संवत २०८१, सौर कार्तिक मास प्रविष्टे २७, रबी उल्लावल ०९, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १२ नोव्हेंबर २०२४. सूर्य दक्षिणायन, दक्षिण गोल, हेमंत ऋत. राहुकाळ दुपारी ३ ते साडेचार वाजेपर्यंत. एकदशी तिथी सायंकाळी ४ वाजून ५ मिनिटांपर्यंत त्यानंतर द्वादशी तिथी प्रारंभ
पूर्वाभाद्रपदा नक्षत्र सकाळी ७ वाजून ५२ मिनिटांपर्यंत, त्यानंतर उत्तरभाद्रपद नक्षत्र प्रारंभ, हर्षण योग सायंकाळी ७ वाजून ९ मिनिटांपर्यंत त्यानंतर वज्र योग प्रारंभ, विष्टी करण सायंकाळी ४ वाजून ५ मिनिटांपर्यंत त्यानंतर बालव करण प्रारंभ, चंद्र दिवसरात्र मीन राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-४६
  • सूर्यास्त: सायं. ६-००
  • चंद्रोदय: दुपारी ३-१९
  • चंद्रास्त: उत्तररात्री ३-४९
  • पूर्ण भरती: सकाळी ८-२५ पाण्याची उंची ३.९४ मीटर, रात्री ९-३२ पाण्याची उंची ३.९६ मीटर
  • पूर्ण ओहोटी: पहाटे २-०८ पाण्याची उंची १.६९ मीटर, दुपारी ३-०२ पाण्याची उंची १.१३ मीटर
  • सण आणि व्रत : कार्तिक एकादशी, पंढरपूर यात्रा, हरीहरेश्वर यात्रा श्रीवर्धन, संत नामदेव महाराज जयंती

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ५६ मिनिटांपासून ते ५ वाजून ४९ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी १ वाजून ५३ मिनिटांपासून ते २ वाजून ३६ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ३९ मिनिटांपासून ते १२ वाजून ३२ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून २९ मिनिटांपासून ते ५ वाजून ५५ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी १० वाजून ४४ मिनिटांपासून १२ वाजून ५ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी ३ ते साडेचार वाजेपर्यंत, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून ५१ मिनिटांपासून ते ९ वाजून ३४ मिनिटांपर्यंत. त्यानंतर रात्री १० वाजून ४६ मिनिटांपासून ते ११ वाजून ३९ मिनिटांपर्यंत, भद्राकाळची वेळ सकाळी ६ वाजून ४२ मिनिटांपासून ते ४ वाजून ४ मिनिटांपर्यंत.पंचक पूर्ण दिवस राहणार आहे.

आजचा उपाय
विठ्ठलाची विधीवत पूजा करून त्याला तुळशीची माळ अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

12 november daily panchang12 नोव्हेंबर दिनविशेष12 नोव्हेंबर पंचांग 2024 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांगकार्तिक एकादशी
Comments (0)
Add Comment