Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजचे पंचांग 12 नोव्हेंबर 2024: कार्तिक एकादशी, विष्णुप्रबोधोत्सव ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ
Today Panchang 12 November 2024 in Marathi: मंगळवार १२ नोव्हेंबर २०२४, भारतीय सौर २१ कार्तिक शके १९४६, कार्तिक शुक्ल एकादशी सायं. ४-०५ पर्यंत, चंद्रनक्षत्र: पूर्वा भाद्रपदा सकाळी ७-५१ पर्यंत, उत्तरा भाद्रपदा उत्तररात्री ५-३९ पर्यंत, चंद्रराशी: मीन,सूर्यनक्षत्र: विशाखा
पूर्वाभाद्रपदा नक्षत्र सकाळी ७ वाजून ५२ मिनिटांपर्यंत, त्यानंतर उत्तरभाद्रपद नक्षत्र प्रारंभ, हर्षण योग सायंकाळी ७ वाजून ९ मिनिटांपर्यंत त्यानंतर वज्र योग प्रारंभ, विष्टी करण सायंकाळी ४ वाजून ५ मिनिटांपर्यंत त्यानंतर बालव करण प्रारंभ, चंद्र दिवसरात्र मीन राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-४६
- सूर्यास्त: सायं. ६-००
- चंद्रोदय: दुपारी ३-१९
- चंद्रास्त: उत्तररात्री ३-४९
- पूर्ण भरती: सकाळी ८-२५ पाण्याची उंची ३.९४ मीटर, रात्री ९-३२ पाण्याची उंची ३.९६ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे २-०८ पाण्याची उंची १.६९ मीटर, दुपारी ३-०२ पाण्याची उंची १.१३ मीटर
- सण आणि व्रत : कार्तिक एकादशी, पंढरपूर यात्रा, हरीहरेश्वर यात्रा श्रीवर्धन, संत नामदेव महाराज जयंती
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ५६ मिनिटांपासून ते ५ वाजून ४९ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी १ वाजून ५३ मिनिटांपासून ते २ वाजून ३६ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ३९ मिनिटांपासून ते १२ वाजून ३२ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून २९ मिनिटांपासून ते ५ वाजून ५५ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी १० वाजून ४४ मिनिटांपासून १२ वाजून ५ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी ३ ते साडेचार वाजेपर्यंत, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून ५१ मिनिटांपासून ते ९ वाजून ३४ मिनिटांपर्यंत. त्यानंतर रात्री १० वाजून ४६ मिनिटांपासून ते ११ वाजून ३९ मिनिटांपर्यंत, भद्राकाळची वेळ सकाळी ६ वाजून ४२ मिनिटांपासून ते ४ वाजून ४ मिनिटांपर्यंत.पंचक पूर्ण दिवस राहणार आहे.
आजचा उपाय
विठ्ठलाची विधीवत पूजा करून त्याला तुळशीची माळ अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त)