सिनेमागृहांवर बिग बजेट चित्रपटांच्या प्रदर्शनाचा सिलसिला सुरूच , या सिनेमांची उत्सुकता

upcoming bollywood movies 2024:दिवाळीच्या मुहूर्तावर ‘सिंघम अगेन’ आणि ‘भूलभुलैया ३’ यांनी एका आठवड्यात ३०० कोटींहून अधिक कमाई केली. यापुढेही सिनेमागृहांवर बिग बजेट चित्रपटांच्या प्रदर्शनाचा सिलसिला सुरूच राहणार आहे. यामध्ये बॉलिवूडपासून हॉलिवूड आणि दाक्षिणात्य अशा बड्या कलाकारांच्या सिनेमांचा समावेश आहे. त्यामुळे आता दिवाळीनंतरही सिनेमांचे जोरदार फटके फुटणार आहेत.

हायलाइट्स:

  • दिवाळीनंतरही बड्या सिनेमांचे फटाके फुटणार!
  • वर्षाअखेरीस मोठ्या सिनेमांच्या प्रदर्शनाचा सिलसिला सुरूच राहणार
  • बॉलिवूड, हॉलिवूड आणि दक्षिणेकडचे बिग बजेच सिनेमे होणार प्रदर्शित
महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई टाइम्स टीमदिवाळीमध्ये ‘सिंघम अगेन’ आणि ‘भूलभुलैय्या ३’नं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. दोघांनी कोट्यवधींची कमाई करून डगमगलेल्या बॉलिवूडला आशेचा किरण दाखवला. या मेगास्टार सिनेमांच्या प्रदर्शनानंतर पुढील दोन आठवडे कोणताही बॉलिवूड सिनेमा प्रदर्शित होणार नाहीय. त्यानंतर मात्र एकामागोमाग मोठे बॉलिवूड, हॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेमे प्रदर्शनासाठी सज्ज आहेत.

तमिळ सुपरस्टार सूर्याचा ‘कंगुवा’ आधी दसऱ्याला प्रदर्शित होणार होता; परंतु रजनीकांत यांचा ‘वेट्टियन’ त्याच दिवशी प्रदर्शित होणार होता; त्यामुळे सूर्यानं त्याचा सिनेमा नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आणायचं ठरवलं. हा सिनेमा हिंदीसह अनेक भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होत असल्यानं सूर्या आता ‘पॅन इंडिया स्टार’ होण्याचा प्रयत्न करत आहे. ‘ग्लॅडिएटर’ या हॉलिवूडच्या लोकप्रिय सिनेमाचा सिक्वेल प्रदर्शनासाठी सज्ज आहे.

रखडलेले सिनेमे प्रदर्शनासाठी

गोध्रा कांडावर आधारित असलेला ‘द साबरमती रिपोर्ट’ हा सिनेमा अनेकदा पुढे ढकलण्यात आला होता. तो लवकरच प्रदर्शित होत आहे. तर नोव्हेंबरच्या चौथ्या आठवड्यात अभिषेक बच्चन आणि शूजित सरकारचा ‘आय वॉट टू टॉक’ हा सिनेमा प्रदर्शित होईल. त्यांच्यासमोर अजय देवगण आणि अनीस बज्मी यांचा ‘नाम’ हा सिनेमा प्रदर्शित होतोय. हा सिनेमा कित्येक वर्षांपासून प्रदर्शनापासून वंचित राहिला होता.

अल्लू अर्जुनची लोकप्रियता जबरदस्त

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ प्रदर्शित होतोय. याच दिवशी ‘छावा’ हा सिनेमादेखील प्रदर्शित होणार होता. पण ‘पुष्पा २’च्या लोकप्रियतेमुळे ‘छावा’ हा सिनेमा पुढे ढकलण्यात आला आहे. पुढील आठवड्यात विधू विनोद चोप्रा यांच्या ‘ट्वेल्थ फेल’ या सिनेमाचा सिक्वेल अर्थात ‘झिरो से रीस्टार्ट’ प्रदर्शित होण्याची चिन्हं आहेत.

नाताळला मोठी स्पर्धा
यंदा नाताळची सुट्टी विचारात घेऊन चित्रपटांमध्ये प्रदर्शनासाठी जोरदार स्पर्धा होणार आहे. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात ‘द लॉयन किंग’ फ्रेंचायझीचा प्रिक्वेल ‘मुफासा : द लॉयन किंग’ प्रदर्शित होईल. त्याच्या जोडीला ‘गदर’फेम अनिल शर्माचा ‘वनवास’ प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. एटली दिग्दर्शित आणि वरुण धवन अभिनित ‘बेबी जॉन’ हा सिनेमाही त्याच दिवशी प्रदर्शित होणार आहे. ‘स्त्री २’ आणि ‘भूलभुलैय्या ३’ या हॉरर कॉमेडी सिनेमांच्या यशानंतर त्यांच्या निर्मात्यांनी नाताळच्या दिवशी ‘ओए भूतनी के’ हा सिनेमा प्रदर्शित करायचं ठरवलं आहे.

आगामी दिवसांमध्ये प्रदर्शित होणारे सिनेमे

१४ नोव्हेंबर – कंगुवा

१५ नोव्हेंबर – ग्लॅडिएटर २

१५ नोव्हेंबर – द साबरमती रिपोर्ट

२२ नोव्हेंबर – आय वॉट टू टॉक

२२ नोव्हेंबर – नाम

२९ नोव्हेंबर – बत्तमीज गिल

५ डिसेंबर – पुष्पा २ : द रूल

१३ डिसेंबर – झिरो से रीस्टार्ट

२० डिसेंबर – वनवास

२० डिसेंबर – मुफासा : द लॉयन किंग

२५ डिसेंबर – ओए भूतनी के

२५ डिसेंबर – बेबी जॉन

लेखकाबद्दलकल्पेशराज कुबलकल्पेशराज कुबल हे ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये सिनिअर डिजिटल कंटेंन्ट क्रिएटर (सिनिअर एंटरटेनमेंट जर्नलिस्ट) म्हणून कार्यरत आहेत. गेल्या ११ वर्षांपासून ते पत्रकारिता, कलाक्षेत्रात कार्यरत आहेत. पत्रकारितेच्या आजअखेरच्या प्रवासात सांस्कृतिक सण-उत्सव, शिक्षण, फॅशन आदी विविध क्षेत्रे, विषयांची हाताळणी त्यांनी केली. विशेषत: गेल्या सहा वर्षांपासून मनोरंजन क्षेत्राचे वृत्तांकन (मराठी सिनेसृष्टी, बॉलिवूड आणि नाट्यसृष्टी विषयी लिखाण.) ते करत आहेत. दैनिकाच्या ‘थ्रीडी’ या चित्रपट समिक्षणाच्या सदरासाठी ते गेल्या पाच वर्षांपासून लिखाण करत आहेत. ‘महाराष्ट्र टाइम्स’मधील ‘माझी पहिली भूमिका’ हे त्यांचे सदर विशेष गाजले. कलाकारांच्या व्यावसायिक प्रवासाविषयी, विविधांगी भूमिकांविषयी या सदरात लिखाण त्यांनी केले आहे. ‘सिनेमा’ या विषयावर नियतकालिके, डिजिटल माध्यमात त्यांनी लिखाण केले आहे. कल्पेशराज हे तरुण पत्रकार असण्यासोबत ते ‘फोटोग्राफर’ आणि ‘आर्टिस्ट’ देखील आहे. तसेच त्याच्या नावावर भारतीय माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचे ‘लार्जेस्ट पेपर पोर्ट्रेट’ बनवण्याचा ‘इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड’ आहे…. आणखी वाचा

Source link

kanguva release dateupcoming bollywood movies 2024upcoming movies 2024आगामी बॉलिवूड सिनेमेकंगुवाद साबरमती रिपोर्टपुष्पा २मनोरंजन विश्वातील घडामोडीसिंघम अगेन
Comments (0)
Add Comment