Maharashtra Election 2024: विधानसभा निवडणुकाचा प्रचार सुरू असताना सोलापूरमध्ये काँग्रेस आणि खासदार प्रणिती शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. पक्षातील जुने नेते शौकत पठाण यांनी AIMIMमध्ये प्रवेश केला आहे.
करारा जवाब मिलेगा असा इशारा शौकत पठाण यांनी दिला होता
शौकत पठाण आणि त्यांच्या सोबत काँग्रेस मधील काही सहकाऱ्यांनी काँग्रेसकडे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मुस्लिम उमेदवार द्यावा अशी मागणी केली होती.प्रणिती शिंदें खासदार झाल्यापासून सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार कोण असणार असा प्रश्न पडला होता. काँग्रेस पक्षाने मुस्लिम आणि मोची सामजाची मागणी बाजूला करत धनगर समाजाचे आणि काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांना उमेदवारी जाहीर केली होती.अपक्ष उमेदवारी अर्ज भरत शौकत पठाण यांनी काँग्रेसला करारा जवाब मीलेगा असा इशारा दिला होता.
काँग्रेस नेत्याचा एमआयएम पक्षात प्रवेश झाल्याने एमआयएमचे पारडे जड
काँग्रेसचे नेते शौकत पठाण हे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात वजनदार नेते म्हणून ओळखले जातात .सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्या नंतर काँग्रेस नेते चेतन नरोटे यांनी शौकत पठाण यांच्या घरी जाऊन समजूत काढत पाठिंबा मागितला होता.काही काळापुरता काँग्रेसला पाठींबा देत,शौकत पठाण यांनी अखेर शेवटच्या क्षणी असद ओवेसी यांच्या उपस्थितीत एमआयएम पक्षात प्रवेश केला.