Baba Siddiqui Accused 30 Minutes Outside Lilavati : बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणातील आरोपी शिव कुमारची पोलिसांकडून चौकशी सुरू असून त्याने या चौकशीत अनेक खुलासे केले आहेत. हत्येनंतर तो लिलावतीबाहेर अर्धा तास उभा असल्याचंही त्याने सांगितलं.
गोळीबार केल्यानंतर आरोपी रुग्णालयाबाहेर काय करत होता?
१२ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी रात्री ९ वाजून ११ मिनिटांनी बाबा सिद्दीकींवर गोळीबार करण्यात आला. दसऱ्याच्या दिवशी झिशान सिद्दीकींच्या ऑफिसबाहेर दसऱ्यानिमित्त फटाके वाजवून सेलिब्रेशन सुरू होतं. त्याचवेळी बाबा सिद्दीकींवर गोळी झाडण्यात आली. त्यांच्या छातीत दोन गोळ्या लागल्या. त्यानंतर त्यांना लगेच लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं.
शिव कुमार गौतम या बाबा सिद्दीकींवर गोळी झाडणाऱ्या मुख्य आरोपीने पोलिसांच्या चौकशीत सांगितलं, की त्याने गोळी झाडल्यानंतर लगेच आधी त्याचं शर्ट बदललं आणि तो गर्दी घुसला. त्यानंतर तो लिलावती रुग्णालयाबाहेर अर्धा तास उभा होती. ज्यावेळी बाबा सिद्दीकींची तब्येत अतिशय नाजूक असल्याची त्याला माहिती मिळाली त्यानंतरच तो रुग्णालयाबाहेरुन निघाला. गोळीबारानंतर बाबा सिद्दीकींचा मृत्यू नक्की झाला की नाही हे तपासण्यासाठी तो लिलावतीबाहेर उभा असल्याचं त्याने पोलिसांनी सांगितलं.
आरोपीची देशाबाहेर पळून जाण्याची योजना
मुंबई क्राईम ब्राँच आणि आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने मुख्य आरोपी शिव कुमार गौतम आणि त्याच्या चार साथीदारांना नेपाळच्या सीमेजवळून अटक केली.
गौतमच्या चार साथीदारांची संशयास्पद वागणुकीवरुन चौकशी सुरू करण्यात आली होती. या चौघांना वेगवेगळ्या मापाचे कपड खरेदी करताना आणि एका जंगलात गौतमला भेटण्याची योजना बनवताना पाहण्यात आलं होतं. त्यांनी लखनऊमधून मोबाईल खरेदी केले होते. त्यावरुन ते इंटरनेट कॉलद्वारे गौतमशी संपर्कात होते. हे चारही जण मुख्य आरोपी गौतमला देशातून बाहेर पळून जाण्यासाठी मदत करण्याची योजना आखत होते.
कसा पकडला गेला मुख्य आरोपी?
गोळीबार केल्यानंतर गौतम रुग्णालयाबाहेरुन कुर्ला इथे गेला. तिथून लोकल ट्रेनने तो ठाण्याला गेला आणि तिथून मग त्याने पुणे गाठलं. त्याने पुण्यात त्याचा मोबाईल फोन फेकला. तो सात दिवस पुण्यात होता. नंतर तो उत्तर प्रदेशातील झांसी आणि तिथून पुढे लखनऊमध्ये गेला. रविवारीच्या दिवशी गौतम उत्तर प्रदेशातील नानपारा शहरापासून जवळपास १० किमीवर लांब असलेल्या झोपडपट्टीत तो तेथील लोकांमध्ये लपला होता. त्याआधी त्याच्या साथीदारांना पकडण्यात आलं होतं. त्यानंतर मुख्य आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली.
बाबा सिद्दीकींवर गोळी झाडली, नंतर लीलावतीबाहेर ३० मिनिटं उभा होता शूटर, कारण काय? पोलिसांनी म्हणाला…
उत्तर प्रदेशातून गौतम त्याच्या दोन साथीदारांना धर्मराज कश्यप आणि गुरमेल सिंह यांना उज्जैन रेल्वे स्टेशनवर भेटणार होता. त्यानंतर बिश्नोई गँगचा एक सदस्य गौतमला घेऊन वैष्णो देवीला जाणार होता. पण धर्मराज कश्यप आणि गुरमेल सिंह यांना आधीच पकडल्यामुळे त्यांचा वैष्णोदेवीला जाण्याचा प्लॅन फसला.