Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बाबा सिद्दीकींवर गोळी झाडली, नंतर लीलावतीबाहेर ३० मिनिटं उभा होता शूटर, कारण काय? पोलिसांनी म्हणाला…

7

Baba Siddiqui Accused 30 Minutes Outside Lilavati : बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणातील आरोपी शिव कुमारची पोलिसांकडून चौकशी सुरू असून त्याने या चौकशीत अनेक खुलासे केले आहेत. हत्येनंतर तो लिलावतीबाहेर अर्धा तास उभा असल्याचंही त्याने सांगितलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी शिव कुमार गौतमची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. आता या चौकशीत त्याने मोठा खुलासा केला आहे. पोलिसांकडे त्याने हत्या केल्याची बाब कबूल केली आहे. बाबा सिद्दीकींना गोळी मारल्यानंतर तो लिलावती रुग्णालयाबाहेर गेला आणि तिथे ३० मिनिटं उभा होता. तो हत्या केल्यानंतर लिलावती रुग्णालयाबाहेर का उभा याचं कारणही त्याने सांगितलं आहे.

गोळीबार केल्यानंतर आरोपी रुग्णालयाबाहेर काय करत होता?

१२ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी रात्री ९ वाजून ११ मिनिटांनी बाबा सिद्दीकींवर गोळीबार करण्यात आला. दसऱ्याच्या दिवशी झिशान सिद्दीकींच्या ऑफिसबाहेर दसऱ्यानिमित्त फटाके वाजवून सेलिब्रेशन सुरू होतं. त्याचवेळी बाबा सिद्दीकींवर गोळी झाडण्यात आली. त्यांच्या छातीत दोन गोळ्या लागल्या. त्यानंतर त्यांना लगेच लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं.
नरिमन पॉईंट ते विरार दीड तासांचा प्रवास ३५ मिनिटांत होणार, कसा असेल मार्ग? कधी सुरू होणार?
शिव कुमार गौतम या बाबा सिद्दीकींवर गोळी झाडणाऱ्या मुख्य आरोपीने पोलिसांच्या चौकशीत सांगितलं, की त्याने गोळी झाडल्यानंतर लगेच आधी त्याचं शर्ट बदललं आणि तो गर्दी घुसला. त्यानंतर तो लिलावती रुग्णालयाबाहेर अर्धा तास उभा होती. ज्यावेळी बाबा सिद्दीकींची तब्येत अतिशय नाजूक असल्याची त्याला माहिती मिळाली त्यानंतरच तो रुग्णालयाबाहेरुन निघाला. गोळीबारानंतर बाबा सिद्दीकींचा मृत्यू नक्की झाला की नाही हे तपासण्यासाठी तो लिलावतीबाहेर उभा असल्याचं त्याने पोलिसांनी सांगितलं.
विद्यार्थी नेते, नगरसेवक, आमदार… नंतर रिअर इस्टेट किंग, बाबा सिद्दीकींना कसं उभं केलं कोट्यवधींचं साम्राज्य

आरोपीची देशाबाहेर पळून जाण्याची योजना

मुंबई क्राईम ब्राँच आणि आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने मुख्य आरोपी शिव कुमार गौतम आणि त्याच्या चार साथीदारांना नेपाळच्या सीमेजवळून अटक केली.

गौतमच्या चार साथीदारांची संशयास्पद वागणुकीवरुन चौकशी सुरू करण्यात आली होती. या चौघांना वेगवेगळ्या मापाचे कपड खरेदी करताना आणि एका जंगलात गौतमला भेटण्याची योजना बनवताना पाहण्यात आलं होतं. त्यांनी लखनऊमधून मोबाईल खरेदी केले होते. त्यावरुन ते इंटरनेट कॉलद्वारे गौतमशी संपर्कात होते. हे चारही जण मुख्य आरोपी गौतमला देशातून बाहेर पळून जाण्यासाठी मदत करण्याची योजना आखत होते.
Raj Thackeray : माझ्या हातात सरकार देऊन पाहा, ४८ तासांत… बाबा सिद्दीकींच्या हत्येबाबत राज ठाकरेंचं मोठं विधान

कसा पकडला गेला मुख्य आरोपी?

गोळीबार केल्यानंतर गौतम रुग्णालयाबाहेरुन कुर्ला इथे गेला. तिथून लोकल ट्रेनने तो ठाण्याला गेला आणि तिथून मग त्याने पुणे गाठलं. त्याने पुण्यात त्याचा मोबाईल फोन फेकला. तो सात दिवस पुण्यात होता. नंतर तो उत्तर प्रदेशातील झांसी आणि तिथून पुढे लखनऊमध्ये गेला. रविवारीच्या दिवशी गौतम उत्तर प्रदेशातील नानपारा शहरापासून जवळपास १० किमीवर लांब असलेल्या झोपडपट्टीत तो तेथील लोकांमध्ये लपला होता. त्याआधी त्याच्या साथीदारांना पकडण्यात आलं होतं. त्यानंतर मुख्य आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली.

बाबा सिद्दीकींवर गोळी झाडली, नंतर लीलावतीबाहेर ३० मिनिटं उभा होता शूटर, कारण काय? पोलिसांनी म्हणाला…

उत्तर प्रदेशातून गौतम त्याच्या दोन साथीदारांना धर्मराज कश्यप आणि गुरमेल सिंह यांना उज्जैन रेल्वे स्टेशनवर भेटणार होता. त्यानंतर बिश्नोई गँगचा एक सदस्य गौतमला घेऊन वैष्णो देवीला जाणार होता. पण धर्मराज कश्यप आणि गुरमेल सिंह यांना आधीच पकडल्यामुळे त्यांचा वैष्णोदेवीला जाण्याचा प्लॅन फसला.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.