Amit Shah Rally at Chandrapur: भाजपचे उमेदवार किशोर जोरगेवार यांना बोलावून जोरगेवार यांना जिंकून द्या, त्यांच्या विजयी रॅलीत मी उपस्थित राहील, असे म्हणत अमित शहांनी मतदारांना साद घातली. पण यावेळी मात्र ते सुधीर मुनगंटीवारांचे नाव विसरले.
दोन वर्षात नक्षलवाद मुक्त गडचिरोली, छत्तीसगड
दरम्यान राजुरातील या प्रचार सभेत शहा यांनी मोठी घोषणा केली. ते म्हणाले, गडचिरोलीत नक्षलवादाला समाप्त करण्याचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. छत्तीसगड येथे नक्षलवाद काही प्रमाणात सक्रिय आहे. पण ३१ मार्च २०२६ मध्ये आम्ही तो समाप्त करू, असे म्हणत शहांनी तारीखही सांगितली. यामुळे शहांच्या या घोषणेची आता चर्चा रंगली आहे.
ठाकरे, शरद पवारांवर टीका
काँग्रेस, उद्धव आणि शरद पवार यांच्या पक्षाने आमच्या प्रत्येक निर्णयाचा विरोध केला. औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने करण्याच्यावेळी ठाकरेंनी विरोध केला. अहिल्याबाईनगर आम्ही केलं, तेव्हा यांनी विरोध केला, अशी टीका शहा यांनी केली.