नगरमध्ये बनावट बंदूक परवाना घेऊन सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या जम्मू काश्मीरमधील 9 जणांना अटक करण्यात आली आहे. मिलिटरी इंटेलिजन्स आणि तोफखाना पोलिसांनी संयुक्त कारवाईत करण्यात आली. 56 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. आरोपी हे सर्व राजौरी जिल्ह्यातील असून खोट्या कागदपत्रांवर नोकरी करत होते. पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आलीये.
राजौरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेल्या माहितीनंतर हे स्पष्ट झाले की, या 9 जणांकडे असलेली शस्त्रपरवाने बनावट आहेत. त्यानंतर पोलिसांनी लगेचच 9 जणांना अटक केली. यांच्याकडून 12 बोअर, 9 रायफल आणि 58 काडतूसे जप्त करण्यात आली आहेत. यामधील सर्वजण हे जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
जम्मू काश्मीरमधील 9 जणांना नगरमधून अटक, पोलिसांकडून मोठी कारवाई
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी याप्रकरणाबद्दल अधिक माहिती दिलीये. या घटनेनंतर मोठी खळबळ निर्माण झालीये. पोलिसांकडून ही मोठी कारवाई बनावट बंदूक परवाना घेऊन नोकरी करणाऱ्यांवर करण्यात आलीये. आता चाैकशीमध्ये हे नऊ जण काय खुलासा करतात हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. काही मोठे खुलासे होऊ शकतात, अशी देखील चर्चा रंगताना दिसतंय.