राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले असून नागरिकांनी उत्साह दाखवला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी मतदान प्रक्रियेवर गंभीर आरोप केले आहेत. जामखेडमधील नान्नज येथील मतदान केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त नव्हता आणि काही ईव्हीएम मशीनवर त्यांच्या आणि त्यांच्या विरोधकांच्या नावासमोर काळा डाग आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. यावेळी ते काही आरोप करताना दिसले आहेत. रोहित पवार म्हणाले की, मी आज सकाळी नान्नज बुथवर गेलो होतो. नान्नज हे गाव जामखेड तालुक्यात येते. तिथे कोणीही पोलिस केंद्रावर नव्हते, गेटवरही कोणी नव्हते. आतमध्ये गाड्या घेऊन लोक येत होते. पावणे सात वाजले तरीही तिथे कोणी नव्हते. खरे तर अधिकारी मतदान केंद्रावर सहालाच येतात. मशीन चेक केल्या जातात.
त्यामुळे हे सीसीटीव्ही कॅमेरे कायम सुरु राहतील, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, ही विनंती. आता रोहित पवार यांनी शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडीओच्याही माध्यमातून मतदान केंद्रावरील परिस्थितीचा आढावा रोहित पवार यांच्याकडून घेण्यात आलाय. रोहित पवार हे शरद पवार गटाकडून ही निवडणूक लढत आहेत. जोरदार प्रचार आपल्या मतदार संघात रोहित पवार यांच्याकडून करण्यात आला.