मविआ, महायुतीत लढत अटीतटीची, दोघांनाही संधी सत्ता स्थापनेची; चक्रावून टाकणारा एक्झिट पोल

Maharashtra Election Exit Poll: सरकार आमचंच येणार, असे दावे महायुती, महाविकास आघाडीचे नेते गेल्या अनेक दिवसांपासून करत आहेत. त्यांचे शब्द झी AIचा एक्झिट पोल पाहून खरे ठरताना दिसत आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: मागील ५ वर्षांत घडलेल्या अभूतपूर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेनं आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केलं. २३ तारखेला निवडणुकीचा निकाल आहे. मतदान संपल्यानंतर विविध एजन्सीजचे एक्झिट पोल समोर आले आहेत. बहुतांश एक्झिट पोलनुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल, असा अंदाज आहे. झी AIच्या एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला मिळणाऱ्या जागांमध्ये फारसा फरक नसेल. त्यामुळे दोघांना सत्ता स्थापनेची संधी मिळू शकते.

सरकार आमचंच येणार, असे दावे महायुती, महाविकास आघाडीचे नेते गेल्या अनेक दिवसांपासून करत आहेत. त्यांचे शब्द झी AIचा एक्झिट पोल पाहून खरे ठरताना दिसत आहेत. राज्यात सत्ता स्थापनेसाठी १४५ चा जादुई आकडा गरजेचा आहे. झी AIच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला १२९ ते १५९, तर मविआला १२४ ते १५४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर अन्य पक्षांना ० ते १० जागा मिळू शकतात.
Maharashtra Election Exit Poll: भाजपची हॅट्ट्रिक, शिंदेसेना ठाकरेंवर भारी, दादांना धक्का; एक्झिट पोल आला; बहुमत कोणाला?
एक्झिट पोलमध्ये विभागावर आकडेवारी देण्यात आलेली आहे. त्यानुसार मुंबईतील ३६ जागांवर महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच असेल. दोघांना १५ ते २० जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे. ठाणे-कोकण पट्ट्यातील ३९ जागांचा विचार केल्यास महायुतीला २३ ते २८, तर मविआला ९ ते १४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. शिवसेना उबाठानं या भागात मविआकडून सर्वाधिक जागा लढवल्या आहेत.
Karale Master: तो आला, एकही शब्द न बोलता थेट मारु लागला! कराळे मास्तरांवर हल्ला, भाजपवर आरोप
विदर्भातील ६२ जागांचा विचार करता महायुती वरचढ ठरण्याचा अंदाज आहे. महायुतीला ३२ ते ३७, तर मविआला २४ ते २९ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लोकसभेत झालेलं नुकसान महायुती विधानसभेत भरुन काढताना दिसत आहे. मराठवाड्यात विधानसभेच्या ४६ जागा येतात. इथे मराठा आरक्षणाचा विषय महत्त्वाचा आहे. महायुतीला १६ ते २१, तर मविआला २४ ते २९ जागा मराठवाड्यात मिळू शकतात.

उत्तर महाराष्ट्रातील ३५ जागांवर अटीतटीची लढत होईल. मविआ आणि महायुतीला इकडे प्रत्येकी १५ ते २० जागा मिळण्याचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ७० जागांवर मविआ महायुतीला मागे टाकेल असं सर्व्हे सांगतो. महायुतीला २८ ते ३३, तर मविआला ३३ ते ४२ जागा मिळू शकतात.

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Congressdevendra fadanvisEknath Shindencpभाजपमहाराष्ट्र एक्झिट पोलमहाराष्ट्र राजकीय बातम्यामहाराष्ट्र विधानसभा निवडणूकशिवसेना
Comments (0)
Add Comment