Significance Of Peacock In Vastu: वास्तुशास्त्रानुसार घरात काही गोष्टी ठेवल्या तर त्यामुळे जीवनात सकारात्मक बदल होत असतात. ऊर्जा ही सकारात्मक आणि नकारात्मक अशी दोन्ही प्रकारची असते. उदाहरणार्थ घरात चांदीचा मोर ठेवला तर सकारात्मक बदल घडून येतात. हे बदल कोणते आहेत ते पाहूया.
वास्तूशास्त्रानुसार प्रत्येक गोष्ट किंवा वस्तू यांचा संबंध ऊर्जेसोबत लावला जातो. आता तुम्ही घरात चांदीचा मोर ठेवला तर त्यापासून सकारात्मक गोष्टी घडतात. जीवनात प्रगती आणि सुख-समृद्धीचे योग तयार होतात. चला, तर मग जाणून घेऊया घरात चांदीचा मोर ठेवल्याचे काय फायदे आहेत.
देवघरात ठेवा चांदीचा मोर
वास्तुशास्त्रानुसार, चांदीचा मोर पूजा घरात ठेवल्याने घरात सकारात्मकता कायम राहून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहते. देवघरात चांदीचा मोर ठेवल्याने घरात सुख-समृद्धी राहून मानसिक शांती समाधान मिळते.
धनसंपत्ती वाढवतो चांदीचा मोर
जर तुमच्या घरात पैशांची समस्या वारंवार येत असेल किंवा पैसे येतील असे वाटते पण येत नाहीत. तर घरात एक छोटासा चांदीचा मोर ठेवणे गरजेचे आहे. चांदीच्या मोराला तिजोरी किंवा जिथे पैसे ठेवता त्या कपाटात चांदीचा मोर ठेवावा. यामुळे धनलाभ तर होतोच तसेच थांबलेले पैसेही मिळतात.
नशिब बळकट करतो चांदीचा मोर
कधी कधी असे होते की आपण खूप मेहनत करतो, पण आपल्याला जे अपेक्षीत आहे तसे यश मिळत नाही. कारण नशिबाची साथ नसते. वास्तुशास्त्रानुसार, नशिब बळकट करण्यासाठी कोणत्याही पूर्णिमेच्या दिवशी चांदीचा मोर आणून त्याला तिजोरीत ठेवावा.
व्यवसाय प्रगती पथावर घेऊन जातो चांदीचा मोर
जर तुमच्या व्यवसायात अडचणी येत असतील किंवा सतत नुकसान होत असेल, तर सकारात्मक ऊर्जेची गरज आहे असे समजा. म्हणून चांदीचा मोर ऑफिस डेस्क किंवा स्टडी टेबलवर ठेवा. ज्या ठिकाणी तुम्ही व्यवसायाशी संबंधित फाइल्स ठेवता, तिथेही चांदीचा मोर ठेवू शकता.
पती-पत्नीमध्ये प्रेम वाढवतो चांदीचा मोर
पती-पत्नीमध्ये लहानमोठे वाद होतच असतात. पण या वादामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. समजा वाद विकोपाला गेला तर नकारात्मक ऊर्जा अधिक वाढून घरामधील शांतता भंग होवू शकते. समजा तुम्ही चांदीचा मोर घरात ठेवला तर घरातील सकारात्मक ऊर्जा कायम राहते तसेच पती-पत्नीमधील प्रेम अधिक वृद्धींगत राहते.