७५ पडले, पण २० नेटाने जिंकले; सोपल ते प्रभू, विधानसभेत पोहोचलेले ठाकरेंचे खंदे शिलेदार कोण?

Shiv Sena UBT MLAs List : पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेने महाविकास आघाडीत लढताना ९५ जागांवर उमेदवार दिले होते. मात्र तब्बल ७५ जणांना पराभवाचा धक्का बसला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे २० आमदार विधानसभेवर निवडून आले आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर केवळ १५ आमदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले होते. त्यापैकी बहुतांश पुन्हा निवडून आले असून काही जणांना पराभवाचा झटका बसला. त्यानंतर c

नितीन देशमुख, सुनील राऊत, सुनील प्रभू, संजय पोतनीस, आदित्य ठाकरे, अजय चौधरी, कैलास पाटील, दिलीप सोपल, भास्कर जाधव हे नऊ जण आमदार पुन्हा निवडून आले आहेत. तर वरुण सरदेसाईंच्या रुपाने नवा आमदार मिळाला आहे.

जोगेश्वरी पूर्व येथून रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांना अनंत (बाळा) नर यांनी पराभवाचा धक्का दिला. तर मातोश्रीचे अंगण मानले जाणारा वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून झिशान सिद्दीकी यांना पराभवाची धूळ चारत आदित्य ठाकरेंचे मावसभाऊ वरुण सरदेसाई यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला पुन्हा खेचून आणला.
Devendra Fadnavis : देवेंद्र हे मोदींचे लाडके, ते मुख्यमंत्री व्हावे ही सर्वांची इच्छा, फडणवीसांच्या ‘मातोश्रीं’ची ‘मन की बात’
माहीम, वरळी, शिवडी, भायखळा हे शिवसेने गड पक्षाने राखले. विशेष म्हणजे माहीम आणि भायखळ्याचे आमदार शिंदे गटात गेले, मात्र ठाकरेंनी ते आपल्याकडे खेचून आणले. माहीममधून सदा सरवणकर आणि अमित राज ठाकरे यांना पराभवाचा धक्का दिला. तर भायखळ्यातून यामिनी जाधव यांना हरवण्यात आलं.
Raj Thackeray : मनसेची दणदणीत हार, लेकालाही पराभवाचा धक्का, राज ठाकरेंची तीन शब्दात प्रतिक्रिया, समाचार कुणाचा?

ठाकरेंचे २० शिलेदार कोण?

मेहकर- सिद्धार्थ खरात
दर्यापूर – गजानन लवाटे
बाळापूर – नितीन देशमुख
वणी – संजय देरकर
परभणी – राहुल पाटील
विक्रोळी – सुनील राऊत
जोगेश्वरी पूर्व- अनंत (बाळा) नर

दिंडोशी – सुनील प्रभू
वर्सोवा – हरुन खान
कलिना – संजय पोतनीस
वांद्रे पूर्व – वरुण सरदेसाई
माहीम – महेश सावंत
वरळी – आदित्य ठाकरे
शिवडी – अजय चौधरी
भायखळा – मनोज जामसूतकर
खेड आळंदी – बाबाजी काळे
उमरगा – प्रवीण स्वामी
उस्मानाबाद – कैलास पाटील
बार्शी – दिलीप सोपल
गुहागर – भास्कर जाधव

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Maharashtra Election Results 2024Maharashtra politicsShiv Sena UBT MLAs ListUddhav ThackerayVidhan Sabha Nivadnukउद्धव ठाकरेठाकरे गट आमदार यादीराजकीय बातम्याशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
Comments (0)
Add Comment