तिवसा मतदारसंघात भाजपाचे राजेश वानखडे यांनी यशोमती ठाकूर यांचा पराभव केला. वानखडे यांनी ठाकूर यांच्यावर टीका करताना त्यांनी मतदारसंघात विकासकामे न केल्याचा आरोप केला. मतदारसंघात पंधरा वर्षे आमदार राहूनही ठाकूर यांनी पाणीपुरवठा, उद्योग आणि तरुणांसाठी काहीही काम केले नाही असा आरोप वानखडे यांनी केला आहे.
यशोमती ठाकूर यांच्या विरोधात भाजपाने राजेश वानखडे यांना मैदानात उतरवले होते. राजेश वानखडे यांनी जोरदार टक्कर देत या निवडणुकीमध्ये यशोमती ठाकूर यांचा पराभव केला. आता राजेश वानखडे यांनी याबद्दल मोठे भाष्य केले. ते यशोमती ठाकूर यांच्यावर जोरदार टीका करताना देखील दिसले आहेत. राजेश वानखडे हे म्हणाले की, यशोमती ठाकूर यांनी मतदार संघामध्ये केलेल्या पैशाच्या चिखलात कमल फुललं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी उद्योग आणले आणि यशोमती ठाकूर यांनी फक्त पैसे खाण्याचे काम केले. तरुणांसाठी काही केलेले नाही, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एखादे सेंटर तरी उघडायचे होते. यशोमती ठाकूर यांनी आराखड्यात बांधलेली एक ही गोष्ट कामाची नाही, असेही भाजपाचे नवनिर्वाचित आमदार राजेश वानखडे यांनी म्हटले. त्यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर जोरदार टीका केल्याचे बघायला मिळाले. यशोमती ठाकूर या तिवसा मतदार संघामध्ये सलग पंधरा वर्ष आमदार होत्या.