महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाला असून, भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरू असून शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची मागणी होत आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. लाडकी बहिण योजनेचा फायदा महायुतीला झाल्याचे बोलले जात आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे बघायला मिळतंय. महायुतीमधील मोठे नेते मुख्यमंत्रीपदाबद्दल भाष्य करत नाहीयेत. पडद्यामागे मोठ्या घडामोडी सुरू असल्याचे देखील दिसतंय. लाडकी बहिण योजनेचा फायदा महायुतीला झाला आहे. एकनाथ शिंदे हे लाडक्या बहिणींचे धन्यवाद मानताना दिसले. अजित पवार यांनीही म्हटले की, आम्हाला लाडकी बहिण योजनेचा फायदा झाला.
शिवसेनेच्या कार्यकर्त्याकडून गाडीपुरा येथील रेणुका माता मंदिरात आरती करण्यात आली. यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावे यासाठी देवीला साकडं देखील घालण्यात आले. दिल्लीतील मोठे नेते याबद्दल निर्णय घेण्याची शक्यता आहे. लोकांच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जातोय. मात्र, महायुतीमध्ये सर्वात जास्त आमदार हे भाजपाचे निवडून आल्याने भाजपाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असेही सांगितले जातंय.