लष्करात भरती होण्याचं स्वप्न अधुरं; पहाटे व्यायाम करताना भरधाव कारची धडक अन्…

Youth Died In Accident Hingoli: लष्करात भरती होऊन देशसेवा करण्याचं स्वप्न डोळ्यात घेत त्यासाठी तयारी करत असतानाच काळाने घाला घातला. भरधाव वाहनाची धडक बसून एका २१ वर्षीय तरुणाने आपला जीव गमावला आहे.

Lipi

गजानन पवार, हिंगोली: हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या पानकनेरगाव येथील युवक दररोज प्रमाणे सकाळी आपली आर्मी भरतीची तयारी करत असताना अज्ञात वाहनाची धडक लागून तरुणाचा मृत्यू झाला आहे‌.

सेनगाव तालुक्यात असलेल्या पान कनेरगाव येथे २६ नोव्हेंबर रोजी सकाळी पाच वाजताच्या सुमारास कार्तिक प्रल्हाद डोंगरे (वय वर्षे २१) हा आर्मी भरतीची तयारी करत असताना रोजच्या प्रमाणे हिंगोली रिसोड रस्त्यावर व्यायाम करण्यासाठी गेला होता. काही वेळ त्याने आपली व्यायामाची तयारी केली. व्यायाम करत असताना रस्त्यावर अंधार असल्याने भरगाव वेगात येत असलेल्या वाहनाने कार्तिकला जोरदार धडक दिली. या धडकेत कार्तिक गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेने पानकनेरगाव परिसरामध्ये एकच शोककळा पसरली आहे.

कार्तिक हा लहानपणी अंदाजीत दोन वर्षाचा असताना २००६ मध्ये आपल्या परिवारासोबत गावाला जात असताना आई, भाऊ आणि बहीण यांच्या वाहनाचा अपघात झाला होता. त्यावेळी दैव बलवत्तर म्हणून कार्तिक या अपघातामधून वाचला होता. पण, या अपघातात त्याची आई, भाऊ आणि बहीण असे तिघांचा मृत्यू झाला होता. या दुःखामधून परिवार कसाबसा सावरला. आता मात्र आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कार्तिक खूप मेहनत करत होता. आर्मीमध्ये जाऊन देश सेवा करायची हे स्वप्न उराशी बाळगत असलेला कार्तिक जिद्दीने भरतीची तयारी करत होता. या दरम्यान, त्याला देखील काळाने हिरावून घेतले आहे. या घटनेने त्याची सावत्र आई व वडील तसेच, नातलगांनवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Hingoli News: लष्करात भरती होण्याचं स्वप्न अधुरं; पहाटे व्यायाम करताना भरधाव कारची धडक अन्…

रिसोड येथील शासकीय सामान्य रुग्णालयात कार्तिक याच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले व पानकनेरगाव गावी रात्री अंत्यविधी करण्यात आला आहे. अज्ञात वाहन चालका विरोधात अजून तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचं यावेळी सेनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी फोनवरून माहिती दिली आहे. तरी, या प्रकरणाचा पुढील तपास सध्या सुरु आहे.

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

hingoli 21 year old youth diedhingoli accidenthingoli newshow to join indian armyहिंगोली अपघातहिंगोली अपघाता तरुणाचा मृत्यूहिंगोली बातम्या
Comments (0)
Add Comment