kartik amavasya upay pitru dosha : दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला स्नान आणि दानधर्माचा विधी खूप महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे पितरांसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते. त्यामुळे पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद मिळतो. जाणून घेऊया कार्तिक अमावस्येला पितरांना प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करायला हवे.
ज्योतिषशास्त्रानुसार हिंदू धर्मातील प्रत्येक दिवसांचे महत्त्व वेगळे आहे. त्याप्रमाणे प्रत्येक महिन्यात येणारी अमावस्या ही देखील खास मानली जाते. अशातच कार्तिक महिन्यातील अमावस्येला वेगळे महत्त्व आहे.
दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला स्नान आणि दानधर्माचा विधी खूप महत्त्वाचा मानला जातो. यंदा ही अमावस्या तिथी १ डिसेंबरला असणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी पूर्वज मृत्यूलोकातून पृथ्वी तलावावर येतात. त्यामुळे पितरांसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते. त्यामुळे पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद मिळतो. जाणून घेऊया कार्तिक अमावस्येला पितरांना प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करायला हवे.
अन्नदान
कार्तिक अमावस्येला पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अन्नदान करायला हवे. या दिवशी स्नान करुन तर्पण केल्यानंतर कच्चे तांदूळ, डाळ, गहू इत्यादी दान करता येते. तर घरात सात्विक अन्न तयार करुन त्यातील काही भाग काढून घ्यावा. तो भाग गाय, कावळा, कुत्रा यांना खाऊ घालावा. याला पंचबली कर्म असे म्हणतात.
दिवे दान करा
कार्तिक अमावस्येला पितरांच्या नावाने दिवे दान करा. परंतु, हा दिवा सूर्यास्तापूर्वी दान करायला हवा. त्यानंतर मातीच्या दिव्यात राईचे तेल घालून वात ठेवा. दिव्याचे तोंड दक्षिण दिशेला ठेवा. असे केल्याने पितरांचा आशीर्वाद आपल्यावर राहातो. तसेच कुटुंबात सुख-समृद्धी आणि प्रगती टिकून राहाते.
गाय आणि तुळशी पूजन
जर तुमच्या कुंडलीत पितृदोष तयार झाला असेल तर कार्तिक अमावस्येला गायीची सेवा करुन तुळशीची पूजा करावी. गाईची पूजा केल्याने पुण्य प्राप्त होते. तसेच तुळशीच्या कृपेने अनेक संकटे दूर होतात. कुटुंबात धन, सुख आणि समृद्धी येईल. अमावस्येच्या दिवशी गाईचे दान केले जाते.
गरुड पुराणाचे पठण
कुंडलीत पितृदोष असेल आणि त्यामुळे तुम्हाला सतत अडचणी येत असतील तर अमावस्येच्या दिवशी गरुड पुराणाचे पठण करा. गरुड पुराणाचे पठण केल्याने पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते. तसेच भगवान विष्णूच्या कृपेने मोक्ष प्राप्ती होते.