पत्नी, मुलीसह शिक्षकाने जीव दिला, काही सेकंदात त्रिकोणी कुटुंबाचा अंत; महाराष्ट्र हादरला

Teacher Commits Suicide with his Daughter and Wife: शिक्षक मसनाजी सुभाषराव तुडमे (वय ४७), पत्नी कान्होपात्रा ऊर्फ रंजना मसनाजी तुडमे (वय ४२), मुलगी अंजली मसनाजी तुडमे (वय २०) अशी मृतांची नावे आहेत.

हायलाइट्स:

  • पत्नी, मुलीसह शिक्षकाची आत्महत्या
  • गंगाखेडमध्ये रेल्वे रुळावर आढळले मृतदेह
  • परभणीमधील हृदयद्रावक घटना
महाराष्ट्र टाइम्स
Parbhani Crime News: रेल्वे ट्रॅकवर पत्नी, मुलीसह शिक्षकाने जीव दिला, काही सेकंदात त्रिकोणी कुटुंबाचा अंत; महाराष्ट्र हादरला

परभणी : गंगाखेड येथील एका विद्यालयातील मसनाजी सुभाषराव तुडमे (वय ४५) या शिक्षकाने पत्नी व मुलीसह गुरुवारी (२८ नोव्हेंबर) दुपारी तीन वाजेच्या सुमारास एका मालगाडीसमोर झोपून आत्महत्या केली. हृदय पिळवटून टाकणार्‍या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या धारखेड शिवारात रेल्वे पुलावर या शिक्षकासह पत्नी व मुलीने रेल्वे मार्गावर झोपून जीवनयात्रा संपवली.शिक्षक मसनाजी सुभाषराव तुडमे (वय ४७), पत्नी कान्होपात्रा ऊर्फ रंजना मसनाजी तुडमे (वय ४२), मुलगी अंजली मसनाजी तुडमे (वय २०) अशी मृतांची नावे आहेत. त्या तिघांचे मृतदेह घटनास्थळी छिन्नविछिन्न अवस्थेत आढळले. उपविभागीय अधिकारी दिलीप टिप्परसे, सहाय्यक पोलिस निरीक्षक आसेफ शेख, जमादार दिपक वावळे यांच्यासह अन्य कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. शिक्षक अहमदपूर तालुक्यातील किनीकद्दु या गावचे मूळ रहिवासी असून, गंगाखेड येथील ममता विद्यालयातील माध्यमिक विभागात ते मराठी विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत होते.

आई-वडिलांसह मुलाचा अंत

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शहरात अशाच एका कुटुंबाचा अपघातात अंत झाला होता. आपल्या मुलाला परभणी येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन आलेल्या आई वडिलांसह मुलाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. परभणी शहरातून वसमतकडे जाणार्‍या महामार्गावर आसोला पाटीजवळ ट्रॅक्टर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना ११ नोव्हेंबर रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून तिन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी ताडकळस पोलिस ठाण्यात विनानंबरच्या ट्रॅक्टर चालवत असलेल्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

परभणी-वसमत रोडने प्रवास करणारे प्रवासी आणि शेतकर्‍यांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मरे आणि स.पोनि बंदखडके तसेच ताडकळस पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, पोलिस उपनिरीक्षक शिवकांत नागरगोजे, अप्पाराव वराडे, रामकिशन काळे, महामार्ग पोलीस पथकाच्या सहायक पोलीस निरीक्षक मीना करपुडे, पोलीस उपनिरीक्षक नाटकर, टाकरस,पोना विजय मुरकुटे, अनिल भराडे व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. तसेच तिन्ही मृतदेह रूग्णवाहिकेतून जिल्हा सामान्य रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविण्यात आले. पोलिस प्रशासनास मदत करण्यासाठी पोलिस पाटील पंढरीनाथ रिक्षे, बाळासाहेब जावळे, ग्रा.पं.सदस्य अरुण डहाळे आदींनी पुढाकार घेतला.

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

crime newsgangakhed teacher family commits suicideparbhani crime newsteacher daughter commits suicide with wifeक्राइम बातम्यागंगाखेड शिक्षक कुटुंब आत्महत्यागंगाखेड शिक्षकाची मुलगी पत्नीसह आत्महत्यापरभणी क्राइम बातम्याशिक्षक मुलगी पत्नी आत्महत्या
Comments (0)
Add Comment