सत्तास्थापनेआधीच शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न? एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपचा स्वबळाचा नारा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 29 Nov 2024, 1:55 pm

Eknath Shinde : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढवणार असल्याचा नारा ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे नवनिर्वाचित आमदार संजय केळकर यांनी दिला असल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम


ठाणे :
आठवडाभरापूर्वी महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला. ज्यात महायुतीला घवघवीत यश मिळाले. त्यातही सर्वाधिक जागा जिंकून भाजप, महायुतीतला वरचढ पक्ष ठरला. अशा अभूतपूर्व यशामुळे भाजपकरांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढवणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे आता महायुतीचं पुढचं चित्र कसं असेल हा औत्सुक्याचा विषय ठरणार आहे. भाजपला राज्यात विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढला असून जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढवणार असल्याचा नारा ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे नवनिर्वाचित आमदार संजय केळकर यांनी दिला असल्याचे बोलले जात आहे, मात्र आमदार केळकर यांनी यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

जिल्ह्यात ठाणे, नवीमुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर आणि भिवंडी या सहा महापालिका आहेत. तर अंबरनाथ, बदलापूर नगरपालिका आहेत.त्यापैकी नवी मुंबई आणि मीरारोड महापालिकांमध्ये भाजपचा महापौर होता. परंतु ठाणे महापालिकेत भाजपचा महापौर झाला नाही. त्यामुळे येत्या निवडणूकीत विजय मिळवून ठाणे, कल्याण डोंबिवली महापालिकेत, बदलापूर नगरपालिकेत भाजपचा महापौर बसविणे हे उद्दिष्ट असल्याचे बोलले जात आहे. महापालिका निवडणूकीत जास्तीजास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आणि महापालिकांवर आपला महापौर बसवण्यासाठी मुख्य भिस्त ही आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर असून आमदार संजय केळकर, गणेश नाईक, किसन कथोरे आणि कुमार आयलानी यांनाही प्रयत्न करावे लागणार आहेत.

माजी मंत्री आणि आमदार रविंद्र चव्हाण यांनी घेतल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका…

भाजपने आता आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील सर्वच जिल्हाअध्यक्षांची एक महत्वाची बैठक घेतली होती. या बैठकीत प्रत्येक विधानसभा मतदार संघात ५० हजार नवीन सदस्य अभियान राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार ठाणे जिल्ह्यात भाजपकडून सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी माजी मंत्री आणि आमदार रविंद्र चव्हाण यांनी विभागवार पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना पक्षवाढीसाठी सदस्य नोंदणीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.

Source link

bjp amdareknath shinde shivsenaMaharashtra politicssanjay kelkar bjpthane corporation electionएकनाथ शिंदेठाणे महापालिकाठाणे शहरभाजप स्वबळावर लढणारस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक
Comments (0)
Add Comment