Sanjay Raut : मुख्यमंत्री अमावस्येच्या मुहूर्तावर गावाला गेलेत, त्यांच्या गावामध्ये… संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा

Sanjay Raut oin Eknath Shinde : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी अजूनही तणाव आहे. एकनाथ शिंदे गावी गेले असून, संजय राऊत यांनी निवडणूक प्रक्रियेत गोंधळ असल्याची टीका केली आहे. ७६ लाख मते वाढल्याने महायुतीला विजय मिळाला असल्याचा संशय आहे. मुख्यमंत्री कोण होईल हे अजून निश्चित नाही.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आता जवळपास एक आठवडा झाला आहे. महायुतीच्या पारड्यामध्ये जनतेने कौल दिल्याचं निकालावरून दिसत आहे. मात्र अजूनही सत्तापेच कायम असलेला पाहायला मिळत आहे. याला कारण मुख्यमंत्रिपदाची खुर्ची ठरलीये. एकनाथ शिंदे सुरूवातील आग्रही असल्याचं समोर आलं होतं. मात्र दिल्लीतील बैठकांनंतर शिंदेंनी पत्रकार परिषद घेत भाजपचे वरिष्ठ जो काही निर्णय घेतील तो मान्य असल्याचं सांगितलं. तरीसुद्धा मुख्यमंत्री कोण हे ठरलेलं नाही. एकनाथ शिंदे अचानक आपल्या सर्व बैठका रद्द करून दरे गावी गेले आहेत. त्यामुळे नेमका काय गोंधळ सुरू आहे याचा काही अंदाजही लागत नाहीये. मात्र शिदेंच्या गावी जाण्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय.

आम्ही असतो तर राष्ट्रपती राजवट लावली असती. निकाल लागून वेळ झाला आहे. निकालाबाबत लोकांच्या मनात संशय असून ते खूशही नाहीत. स्वत: काळजीवाहू मुख्यमंत्री नाराज होऊन अमावस्येच्या मुहूर्तावर आपल्या गावाला गेले आहेत. अमावस्येचं काय महत्त्व आहे हे मला कळत नाही, त्यांच्या गावामध्ये कोणती देवी आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, होतायेत महाराष्ट्र वाट पाहतोय कधी घोषणा होतेय का आणखीन कोणाचं नाव येतंय हे मला माहित नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार माहिती समोर येत आहे पण तो सूर्य काही उजाडत नाहीये. नोव्हेंबर संपेल आणि डिसेंबर उजाडेल, तुम्ही पाच तारखेचा वायदा करत आहात पण तोपर्यंत आमचे काळजीवाहू मुख्यमंत्री काय करतील याचा भरोसा नाही. माझ्या माहितीप्रमाणे ते मनानं खचलेत, अस्वस्थ असून त्यांचं मानसिक आणि शारीरिर स्वास्थ बिघडलंय त्याला जबाबदार कोण? त्यांना कोणी काही शब्द देऊन फिरवलाय का? असे अनेक गंमतीशीर विषय चर्चेत आहेत. मी फक्त लाडका भाऊ इतकंच बडबडतायेत. पण ते आता मोदी शहांचे लाडका भाऊ राहिलेले दिसत नाहीत. देवेंद्रजींचेही लाडके भाऊ दिसत नाहीत पण ते सतत लाडका भाऊ बडबडत आहेत, त्यांना उपचाराची गरज आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनी योग्य पद्धतीने उपचार केले पाहिजेत, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

या राज्याच्या निकालाबाबत देशातच नाहीतर जगातील अनेक भागांमध्ये संशय व्यक्त केला जात आहे. ७६ लाख मते वाढली कशी? सामना चित्रपटामधील मारुती कांबळेचं झालं काय? तसं या ७६ लाख मतांचं काय झालं आणि ५ वाजल्यापासून ७ वाजेपर्यंत ही मते कुठून आलीत. हरियाणामध्ये १४ लाख मते वाढली होतीत. तर महाराष्ट्रातील निवडणुकीमध्ये पाच पासून साडे अकरापर्यंत ७६ लाख मतांचा हिशोब लागत नाही. हा वाढलेली मतेच महायुतीच्या विजयाचे शिल्पकार आहेत. लाडकी बहीण योजना या योजनांमध्ये काही तथ्य नाही, असं म्हणत राऊतांनी पुन्हा एकदा ईव्हीएम निकालाबाबत शंका उपस्थित केली आहे.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

Sanjay Rautsanjay raut marathi newssanjay raut press conferenceसंजय राऊत पत्रकार परिषदसंजय राऊत बातम्यासंजय राऊत मराठी बातम्या
Comments (0)
Add Comment