६ महिन्यांपूर्वीचा वाद मिटवण्यासाठी तरुणाला बोलावले अन् १० जणांनी…; घटनेने सारेच हादरले, नेमके काय घडले?

Chh.Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगरमधून हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे. ६ महिन्यांपूर्वी झालेल्या वादातून एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. हा रक्तरंजित थरार पाहून सारेच हादरले आहेत.

Lipi

सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे. ६ महिन्यांपूर्वी झालेल्या जुन्या वादातून एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. जुना वाद मिटवायचा असल्याचे कारण देत तरुणाला निर्जनस्थळी बोलावत ८ ते १० जणांनी चाकू व बॅटने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, यात त्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास हर्सूल जेलसमोरील एन१३ मैदानावर ही घटना घडली आहे.

वृत्तानुसार, दिनेश उर्फ बबलू परमानंद मोरे हा २६ वर्षीय तरुण चेतना नगर हर्सूल येथे वास्तव्यास होता. दिनेशचा ६ महिन्यांपूर्वी एका इसमाशी वाद झाला होता. या वादामुळे दोन गटांमध्ये संघर्ष पेटला. दोन दिवसांपासून बबलू मारेकरी हे त्याच्या माघावर होते. परंतु आज बबलू आज त्यांच्या जाळ्यात अडकला. जुना वाद मिटवायचा आहे, असा बहाणा बनवून त्याला भेटण्यासाठी बोलावले आणि डाव टाकला.
Crime News : गोणीत बॉडी, कपाळावर टिका… तीन दिवसांपासून बेपत्ता मुलासोबत काय घडलं? पोलिसांना वेगळाच संशय
आपले शत्रू आपल्याविरोधात असा कट रचतील यापासून अनभिज्ञ असणाऱ्या बबलूने हर्सूल जेलसमोरील एन १३ येथील मैदान गाठले. त्याचे इतर सहकारी देखील त्याच्यासोबत होते. आरोपींनी बबलूच्या गळत हात टाकत गप्पा सुरू केल्या. तेवढ्या कोणीतरी बबलूच्या पोटात चाकूने भोसकले. तर इतर काही तरुणांनी त्याला बॅटने मारहाण केली. यात बबलू गंभीर जखमी झाला. त्याच्यासोबत असलेला सुमित चव्हाण देखील गंभीर जखमी झाला. नागरिकांनी दिनेश याला रिक्षात टाकून घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी गणेश सोनवणे, संकेत गायकवाड, अनिकेत गायकवाड, योगेश यासह इतर आरोपींचा यात समावेश असल्याची माहिती आहे. तर पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

६ महिन्याभरापूर्वी झाला होता साखरपुडा

दिनेश उर्फ बबलू याचा ६ महिन्यांपूर्वी साखरपुडा झाला होता. तर १५ डिसेंबर त्याचे लग्न देखील होणार होते. मात्र त्यापूर्वीच बबलूचा खून झाल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बबलूचा मित्रपरिवार मोठा होता. बबलूचा खून झाल्याची माहिती मिळताच त्याच्या मित्र परिवाराने घाटी रुग्णालयामध्ये धाव घेतली. यावेळी घाटी रुग्णालयासमोर मोठी गर्दी जमली होती.

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

chh.sambhajinagar crimechh.sambhajinagar policemurder caseold dispute murderyouth killed by groupछ.संभाजीनगर गुन्हेगारीछ.संभाजीनगरमधून मोठी बातमीजुन्या वादातून हत्यातरुणाचा निर्दयी खूनहत्येचा गुन्हा
Comments (0)
Add Comment