आता कळेल भाजप काय आहे! अजितदादा-शिंदेंमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न होतोय, राऊतांचा घणाघात

Sanjay Raut Slams BJP: भाजप काय आहे हे आता शिंदेंना कळेल. तेव्हा त्यांना मूळ शिवसेना तोडायची होती म्हणून त्यांनी गोंजारलं, पण आता भाजपकडून अजित पवार आणि शिंदेंमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हायलाइट्स:

  • शिवसेना तोडायची होती म्हणून त्यांना गोंजारलं
  • आता त्यांना कळेल भाजप काय आहे ते
  • संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: भाजप काय आहे आता शिंदेंना कळेल, भाजपकडून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात भांडणं लावण्याचं काम सुरु असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे. तसेच, त्यांनी सरकार स्थापन करायला वेळ लागत असल्याने भाजपवर निशाणा साधला आहे. निकाल लागून दहा दिवस झाले, तरी सरकार स्थापन झालं नाही. बहुमत असेलला पक्ष अद्याप राजभवनात जाऊन राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करत नाही. आमदारांची यादी देत नाही. राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी अजून निमंत्रित केलं नाही. पण, भाजप प्रदेशाध्यक्षांकडून शपथविधीची तारीख जाहीर केली जाते. आझाद मैदानावर शपथविधीची तयारी सुरु होते. हा काय प्रकार आहे, असं विचारत संजय राऊतांनी संताप व्यक्त केला.

एकनाथ शिंदे गटाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, मुळात ती खरी शिवसेना नसल्याने त्यांना ही अपमान सहन करावा लागत आहे, पुढेही सहन करावा लागेल. अडीच-तीन वर्षांपूर्वी भाजप त्यांना गोंजारत होते, ते यासाठी कारण त्यांना आमची मूळ शिवसेना तोडायची होती. महाराष्ट्र कमजोर करायचा होता.
आता त्यांना कळेल भाजप काय आहे, भाजपचं अंतरंग काय आहे आणि बाह्यस्वरुप काय आहे. मुळात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात तुफान भांडणं लावण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोपही संजय राऊतांनी यावेळी केला.

ते दोघे एकत्र निवडणुका लढले, काल अजित पावर दिल्लीत होते, रात्रभर दिल्लीत फिरत होते. भेटीगाठी घेत होते. सरकार महाराष्ट्राचं आणि अनेक नेते दिल्लीत, असं चित्र आहे. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी भाजपला वाटत नाहीये, असं म्हणत राऊतांनी महायुतीला टोला लगावला आहे.

अशा परिस्थितीत जे सरकार स्थापन होणार आहे तो फार मोठा विनोद असणार आहे. पण, हे सरकार लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवून येत आहे.
कारण ज्यांनी मतदान केलं, त्यांचा आपण केलेल्या मतदानावर निवडून आलेल्या सरकारवर विश्वास नाही. गावागावात फेरमतदान घेत आहे, यावर निवडणूक आयोगाने भाष्य केलं पाहिजे.

Sanjay Raut: आता कळेल भाजप काय आहे! अजितदादा-शिंदेंमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न होतोय, राऊतांचा घणाघात

मारकडवाडीत १४४ कलम लावलं, लोकशाही पद्धतीने मतदान घेऊ इच्छिणाऱ्या लोकांवर १४४ कलम लावून त्यांना घरातून ठांबून ठेवलं जात आहे अशा धमक्या दिल्या जातात. त्या मतदासंघात भाजपचा पराभव झाला आहे, पण लोकांच्या मते विजयी उमेदवाराला मिळालेली मतं कमी आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

ajit pawarbjp government formationEknath Shindemahayutisanjay raut criticize bjpअजित पवारएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसमहायुती सरकारसंजय राऊत
Comments (0)
Add Comment