sindhudurg Accident News : मुंबई-गोवा महामार्गावर सिंधुदुर्गातील नांदगाव-ओटव फाटा येथे मध्यरात्री दोनच्या सुमारास पुणे ते सिंधुदुर्ग जाणारी विद्यार्थ्यांची एसटी बस संरक्षक कठड्याला धडकली. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला परंतु बसचा वेग कमी असल्याने मोठा अपघात टळला. विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ते सिंधुदुर्ग अशी विद्यार्थ्यांना घेऊन ही बस सिंधुदुर्गातील प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी निघाली होती ही बस विद्यार्थ्यांना घेऊन मालवणच्या दिशेने जात असताना हा अपघात घडल्याची माहिती स्थानिकांकडून समोर येत आहे.मध्यरात्री दोनच्या सुमारास चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस नांदगाव-ओटव बॉक्सवेलवरील संरक्षक कठड्याला आदळली. सुदैवाने बसचा वेग कमी असल्याने मोठा अपघात टळला. सर्व विद्यार्थी गाढ झोपेत होते. यातील काही जणांना किरकोळ दुखापती झाल्या. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार चालकाला मध्यरात्री अचानक झोप लागल्यामुळे त्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटल्याचं म्हटलं जात आहे.तसेच वेगावर नियंत्रण असल्यामुळे फार मोठा अपघात घडला नाही.
एसटी बस ही संरक्षण कठड्याला धडकताच मोठा आवाज आला.त्यामुळे स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतलीय. एसटीचा अपघात घडल्यामुळे विद्यार्थीही घाबरून गेले होते त्यामुळे घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी आरडाओरड केला.तसेच तातडीने १०८ रूग्णवाहिका मागवून जखमींना कणकवली उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. मात्र या घडलेल्या अपघाताची माहिती स्थानिक पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली आहे हवालदार चंद्रकांत झोरे, श्री माने, तसेच महिला कॉन्स्टेबल प्रणाली जाधव हे घटनास्थळी दाखल झाले होते.