Mhada Lottery: म्हाडाच्या सोडत विजेत्यांना आणखी चार ते सहा महिन्यांची प्रतीक्षा, कारण….

महाराष्ट्र टाइम्स | Updated: 5 Dec 2024, 7:00 am

Mhada Home Lottery Winner: म्हाडाने ऑक्टोबरमध्ये मुंबई शहर आणि उपनगरांतील २,३२७ घरांसाठी सोडत काढली होती. त्यासाठी १,३४,३५० ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आणि यातील १,१३,८११ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा करून सोडतीमध्ये भाग घेतला.

हायलाइट्स:

  • म्हाडाच्या सोडत विजेत्यांना आणखी चार ते सहा महिन्यांची प्रतीक्षा
  • इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्याविना सोडतीमध्ये घरांचा समावेश केला जात नाही
  • अंतर्गत कामे अजूनही बाकी
महाराष्ट्र टाइम्समुंबई म्हाडा लॉटरी बातम्या
मुंबई म्हाडा लॉटरी बातम्या

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे ऑक्टोबरमध्ये काढण्यात आलेल्या घरांच्या सोडतीतील अनेक विजेत्या अर्जदारांना अद्यापही घरांची प्रतीक्षा आहे. या सोडतीतील एकूण २,०३० घरांपैकी तब्बल १,३२७ घरे बांधकामाधीन आहेत. या घरांची अंतर्गत कामे पूर्ण होण्यास आणखी चार ते सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून प्रसिद्ध होणाऱ्या घरांच्या सोडतीकडे मुंबईकरांचे लक्ष लागलेले असते.म्हाडाने ऑक्टोबरमध्ये मुंबई शहर आणि उपनगरांतील २,३२७ घरांसाठी सोडत काढली होती. त्यासाठी १,३४,३५० ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आणि यातील १,१३,८११ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा करून सोडतीमध्ये भाग घेतला. ८ ऑक्टोबर रोजी अर्जदार विजेत्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्याविना सोडतीमध्ये घरांचा समावेश केला जात नाही. तरीही त्या सोडतीमध्ये १,३२७ घरांचा समावेश करण्यात आल्याकडे लक्ष वेधले जात आहे.
फडणवीसच मुख्यमंत्री! मुंबईत आझाद मैदानावर आज महायुतीचा शपथविधी सोहळा, मंत्रिमंडळात संधी कोणाला?

अंतर्गत कामे अजूनही बाकी

म्हाडाची सोडत वाजतगाजत यशस्वी झाली असली तरीही इतक्या घरांचा ताबा प्रत्यक्षात कधी मिळणार, असा प्रश्न विजेत्या अर्जदारांकडून केला जात आहे. म्हाडाच्या सोडतीतील घरांची अंतर्गत कामे पूर्ण होण्यास चार ते सहा महिने लागतील, असे सांगण्यात येते. ती तरी कामे वेळेत पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा या विजेत्या अर्जदारांनी व्यक्त केली आहे.

Source link

Mhada lotterymumbai latest marathi newsmumbai mhada lottery newsमुंबई म्हाडा लॉटरी बातम्यामुंबई लेटेस्ट मराठी बातम्याम्हाडा लॉटरीम्हाडा सोडत
Comments (0)
Add Comment