आजचे पंचांग 7 डिसेंबर 2024: चंपाषष्ठी, द्विपुष्कर योग, रवि योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 7 December 2024 in Marathi: शनिवार, ७ डिसेंबर २०२४, भारतीय सौर १६ अग्रहायण शके १९४६, मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी सकाळी ११-०५ पर्यंत, चंद्रनक्षत्र: धनिष्ठा सायं. ४-४९ पर्यंत, चंद्रराशी: कुंभ, सूर्यनक्षत्र: ज्येष्ठा

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति मार्गशीर्ष ६, शक संवत १९४६, मार्गशीर्ष शुक्ल, षष्ठी, शनिवार, विक्रम संवत २०८१, सौर मार्गशीर्ष मास प्रविष्टे २२, जमादी उल्सानी ०४, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ७ डिसेंबर २०२४. सूर्य दक्षिणायन, दक्षिण गोल, हेमंत ऋत. राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत.
षष्ठी तिथी सकाळी ११ वाजून ७ मिनिटांपर्यंत त्यानंतर सप्तमी तिथी प्रारंभ. धनिष्ठा नक्षत्र सायंकाळी ४ वाजून ५१ मिनिटांपर्यंत त्यानंतर शतभिषा नक्षत्र प्रारंभ, व्याघात योग सकाळी ८ वाजून ४२ मिनिटांपर्यंत त्यानंतर हर्षण योग प्रारंभ, तैतील करण दुपारी ११ वाजून ०७ मिनिटांपर्यंत त्यानंतर वणीज करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र कुंभ राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ७-००
  • सूर्यास्त: सायं. ६-००
  • चंद्रोदय: सकाळी ११-५९
  • चंद्रास्त: रात्री ११-४४

  • पूर्ण भरती: पहाटे ३-४४ पाण्याची उंची ४.२२ मीटर, दुपारी ३-५८ पाण्याची उंची ३.३४ मीटर
  • पूर्ण ओहोटी: सकाळी १०-०७ पाण्याची उंची १.९४ मीटर, रात्री ९-३७ पाण्याची उंची १.४५ मीटर
  • सण आणि व्रत : चंपाषष्ठी, स्कंदषष्ठी, मार्तंडभैरव उत्थापन, ध्वजदिन, द्विपुष्कर योग, रवि योग

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून १५ मिनिटांपासून ते ६ वाजून ९ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३ मिनिटांपासून ते २ वाजून ४६ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५२ मिनिटांपासून ते १२ वाजून ४६ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ३१ मिनिटांपासून ते ५ वाजून ५८ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ८ वाजून १९ मिनिटांपासून ९ वाजून ३७ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत गुलीक काळ, दुपराी दीड ते साडे तीन वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ संध्याकाळी ४ वाजून १० मिनिटांपासून ते ४ वाजून ५२ मिनिटांपर्यंत, भद्राकाळ सकाळी ७ वाजून ५० मिनिटांपर्यंत ते ६ वाजून २४ मिनिटांपर्यंत

आजचा उपाय
ओम शं शनैश्चराय नमः मंत्राचा जप करा.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

7 december daily panchang7 डिसेंबर दिनविशेष7 डिसेंबर पंचांग 2024 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांगचंपाषष्ठी
Comments (0)
Add Comment