नॅशनल नही इंटरनॅशनल! जगभरात ‘पुष्पा २’ची वाइल्डफायर; कमाईमध्ये टॉप सिनेमांना धूळ चारली

Pushpa 2 Worldwide Collection: अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’ने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार सुरुवात केली. या चित्रपटाने पहिल्या दिवशी जगभरात २७९.२० कोटी रुपयांची कमाई केली आहे.

हायलाइट्स:

  • ‘पुष्पा २: द रुल’ ठरला सर्वात मोठी ओपनिंग करणारा सिनेमा
  • RRR आणि बाहुबली २ पडले मागे
  • ‘जवान’, ‘पठाण’ जवळपासही नाहीत

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: ‘सुपरस्टार अल्लू अर्जुन’ हेच नाव सध्या सिनेप्रेमींच्या मुखात आहे. त्याच्या ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटाने असे काही रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत, जे आतापर्यंत इतर काही स्टारच्या नावावर होते. अल्लू अर्जुन आता संपूर्ण भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक मोठी ओपनिंग करणारा अभिनेता ठरला आहे. या चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनने सगळीकडेच धुमाकुळ घातला आहे. एकदंरित ‘पुष्पा का राज’ सगळीकडे पाहायला मिळाले.

परदेशातही छप्परफाड कमाई

‘पुष्पा २’ने देशातच नाही तर परदेशातही चांगली कमाई केली. सुकुमार दिग्दर्शित या सिनेमासाठी सुमारे ५०० कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आणि या चित्रपटाला बंपर आगाऊ बुकिंग मिळाले. पहिल्याच दिवशी या सिनेमाने कमाईचा मोठा आकडा गाठला आहे.

‘पुष्पा २’ ने ओपनिंगच्या दिवशी मोडले रेकॉर्ड

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने भारतातील बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी सुमारे १७४.९ कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाने तेलगूमध्ये सर्वाधिक ९०.९५ कोटी रुपये आणि हिंदीमध्ये ७०.३ कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाने तामिळमध्ये ०७.७ कोटी, कन्नडमध्ये १ कोटी रुपये आणि मल्याळममध्ये ०४.९५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या कमाईने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ‘आरआरआर’ (१५६ कोटी) आणि ‘बाहुबली २’ (१५३ कोटी) या चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईला मागे टाकले. ‘कल्की २८९८ एडी’, ‘जवान’, ‘पठाण’ हे चित्रपट तर ‘पुष्पा २’च्या कमाईपुढे बरेच मागे आहेत.

महिलेच्या मृत्यूनंतरही सुधारले नाहीत! ‘पुष्पा २’च्या चाहत्यांनी थिएटरमध्ये लावली आग; काही ठिकाणी तोडफोड

जगभरात किती झाली कमाई?

या चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास ‘पुष्पा २’ने आतापर्यंतच्या सर्व हिट चित्रपटांना मागे टाकले. ‘पुष्पा २’ ने पहिल्याच दिवशी जगभरात मिळून २७९.२० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने रीलिजच्या पहिल्या दिवशीच परदेशात ७० कोटींची कमाई केली आहे, ज्यामुळे ‘RRR’ (२२३ कोटी) आणि ‘बाहुबली २’ (२१७ कोटी) हे चित्रपट मागे पडले आहेत. ‘आरआरआर’ने परदेशात पहिल्या दिवशी ६७ कोटी रुपये कमावले होते, तर ‘बाहुबली २’ची पहिल्या दिवसाची परदेशातील कमाई ६५ कोटी रुपये होती.

रीलिजपूर्वीच मोडलेले रेकॉर्ड

‘पुष्पा २’च्या पहिल्या दिवसाचे आकडे आणि दुसऱ्या दिवसाचे ॲडव्हान्स बुकिंग पाहता असे चित्र आहे की, पहिल्याच वीकेंडमध्ये हा सिनेमा ५०० कोटींचा टप्पा गाठेल. याशिवाय देशातील विविध शहरात या सिनेमासाठी रात्रीचे २ शो वाढवण्यात आले आहेत. ‘पुष्पा २’ ने रिलीजपूर्वी अनेक विक्रम मोडीत काढले आणि रीलिजनंतरीही ही घौडदौड सुरू आहे. या कलेक्शनने निर्मात्यांपासून कलाकारांपर्यंत सर्वांमध्येच सुखाची लाट पसरली आहे.

लेखकाबद्दलजान्हवी भाटकरजान्हवी भाटकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. डिजिटल आणि टेलिव्हिजन मीडियामध्ये ५ वर्षांचा अनुभव. ‘न्यूज १८ लोकमत’मधून डिजिटल मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात. ऑनलाइन माध्यमांमध्ये ३ वर्ष कार्यरत. मनोरंजन, लाइफस्टाइल आणि अर्थ विषयात आवड…. आणखी वाचा

Source link

Allu Arjun As Pushpa 2pushpa 2 box office collectionpushpa 2 the rule box office worldwide collectionSrivalli Rashmika Mandannaअल्लू अर्जुन सिनेमा अपडेटपुष्पा 2 अल्लू अर्जुनपुष्पा 2 कलेक्शनपुष्पा 2 बॉक्स ऑफिस कलेक्शनरश्मिका मंदानारश्मिका मंदाना अल्लू अर्जुन
Comments (0)
Add Comment