Pushpa 2 Earning: पुष्पा २ सिनेमा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.
‘पुष्पा २: द रुल’ ची निर्मिती कंपनी Mythri Movie Makers ने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत, ‘पुष्पा २’ ने जगभरात ५०० कोटींहून अधिक कमाई केली केल्याचे सांगितले. पुष्पा २ ने जगभर धुमाकूळ घातला आहे. भारतात ३ दिवसात चित्रपटाने ३८३.७ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
‘पुष्पा २: द रुल’चे तिसऱ्या दिवशीचे कलेक्शन
मिळालेल्या माहितीनुसार, ‘पुष्पा २: द रुल’ ने शनिवारी भारतातील सर्व भाषांमध्ये ११५ कोटी रुपये जमा केले. तेलगूमध्ये या चित्रपटाने ३१.५ कोटी रुपये कमावले, तर हिंदीमध्ये चित्रपटाने ७३.५ कोटी रुपये कमावले. या चित्रपटाने तमिळमधून ७.५ कोटींची कमाई केली. कन्नडमध्ये केवळ ८० लाखांची कमाई केली. मल्याळम भाषेतून १.७ कोटी रुपये जमवले आहे.
‘पुष्पा २: द रुल’चा हिंदी कलेक्शन जास्त, तर कन्नडमध्ये कमी
‘पुष्पा २: द रुल’ ने भारतात तीन दिवसांत एकूण ३८३.७ कोटी रुपये जमा केले आहेत. तेलुगूमध्ये आतापर्यंत १५१.०५ कोटी रुपये कमावले आहेत. आतापर्यंत निर्मात्यांनी चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमधून २००.७ कोटी रुपये कमावल्याचे जाहिर केले. बॉक्स ऑफिस आकडेवारीच्या बाबतीतही ‘पुष्पा २’ अनेक विक्रम केले आहे. ३ दिवसांत २०० कोटींची कमाई करणारा हा हिंदीतील पहिला तेलगू चित्रपट ठरला आहे. कन्नड मध्ये सिनेमाने २.४७ कोटी रुपयांची कमाई केली.