पुष्पा २ ने साधली संधी, अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर सिनेमाने कमावले तब्बल इतके कोटी

Pushpa 2 Box Office Collection Day 8 : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ या सिनेमाचं आठव्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई – अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ सिनेमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. देश असो किंवा परदेश अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिलचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दररोज बंपर कमाई करत आहे. दरम्यान, शुक्रवारी हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक केली, ज्यामुळे त्याचे चाहते प्रचंड नाराज झाले. परंतु बॉक्स ऑफिसवर पुष्पा 2 चा वेग कमी झालेला नाही. याउलट चित्रपटाने दुसऱ्या शुक्रवारी चांगली कमाई केली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुष्पा 2 ने नवव्या दिवशी २७.५ कोटींची कमाई केलीये. यानंतर आता भारतात पुष्पा 2 ची एकूण कमाई ७५० कोटींच्या पुढे गेली आहे. अल्लू अर्जुनच्या चित्रपटाचे जगभरात बॉक्स ऑफिस कलेक्शन १०८० कोटींच्या आसपास पोहोचले आहे.मात्र, हे सिनेमाच्या कलेक्शनचे अंदाजे आकडे असून ते बदलण्याची शक्यता आहे.

पुष्पा २ ने साधली संधी, अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर सिनेमाने कमावले तब्बल इतके कोटी

गेल्या आठ दिवसांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचं झाल्यास पुष्पा 2 ने पहिल्या दिवशी १७४ कोटी २५ लाख रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ९३.८ कोटींचा गल्ला जमवला. तर तिसऱ्या दिवशी चित्रपटाने ११९.२५ कोटींची कमाई केली. चौथ्या दिवशी कमाई १४१.०५ कोटींवर पोहोचली आहे. पाचव्या दिवशी कलेक्शन ६४.४५ कोटी होतं. चित्रपटाने सहाव्या दिवशी ५१.५५ कोटींची कमाई केली. त्यामुळे चित्रपटाने सातव्या दिवशी ४३.३५ कोटींची कमाई केली. आठव्या दिवशी चित्रपटाचा आकडा २७.५ कोटींवर पोहोचलाय.
‘अभिनेत्री असताना हा सन्मान मिळणं दुर्मिळ’ मानाचा पुरस्कार मिळाल्यानंतर प्राजक्ता माळी भावुक
आठ दिवसात या सिनेमाने ७२६ कोटी २५ लाखांचं कलेक्शन केलं असून त्यापैकी तेलुगूमध्ये २४१ कोटी, हिंदीमध्ये ४२५.६ कोटी, तमिळमध्ये ४१ कोटी, कन्नडमध्ये ५.३५ कोटी आणि मल्याळममध्ये १२.४ कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या वीकेंडला हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या वीकेंडला हा चित्रपट १५०० कोटींचा टप्पा पार करेल अशी अपेक्षा आहे. तर चित्रपटाने आधीच ५०० कोटी रुपयांचे बजेट वसूल केले आहे. त्यामुळे अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहद फासिल यांच्या बहुप्रतिक्षित सिनेमा पुष्पा 2 चं बॉक्स ऑफिस कलेक्शन प्रत्येक दिवसागणिक विक्रम मोडत आहे.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्न म्हणून कार्यरत आहे. मराठी साहित्यात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. मनोरंजनविषयक बातम्या लिहिण्याची आवड. वाचनाची आणि लिखाणाची आवड…. आणखी वाचा

Source link

allu arjun latest newsPushpa 2 box office collection day 8pushpa 2 Budgetpushpa 2 latest newspushpa 2 release datepushpa 2 total collectionअल्लू अर्जुनअल्लू अर्जुन पुष्पा २पुष्पा 2 अल्लू अर्जुनपुष्पा २ द रूल
Comments (0)
Add Comment