Loveyapa And Sanam Teri Kasam : पुन्हा प्रदर्शित होऊनसुद्धा ‘सनम तेरी कसम’ सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे तर जुनैद खान आणि खुशी कपूर यांचा ‘लव्हयापा’ सिनेमा फ्लॉप होण्याच्या मार्गावर आहे.
‘लव्हयापा’ चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन
‘लव्हयापा’ १.१५ कोटींनी ओपन झाला. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने दुसऱ्या दिवशी १.५० कोटी रुपये कमावले आहेत. यानुसार, चित्रपटाचं आतापर्यंतचं एकूण कलेक्शन २.६५ कोटी रुपये आहे. चित्रपटाच्या बजेटनुसार हे खूपच कमी आहे. हिमेश रेशमियाच्या ‘बॅडास रविकुमार’ सिनेमाला वाईट प्रतिसाद मिळूनही यापेक्षा चांगलं कलेक्शन करत आहे.
कानामागून आली अन्…; रि-रिलीज होऊनही ‘सनम तेरी कसम’ला प्रेक्षकांची पसंती, तर ‘लव्हयापा’ फ्लॉपच्या मार्गावर
‘लव्हयापा’ ‘सनम तेरी कसम’पेक्षा मागे पडला
‘सनम तेरी कसम’ हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी हिट झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ५.१४ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन आणि हर्षवर्धन राणे मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट आता ७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. व्हॅलेंटाईन वीकचा फायदा या चित्रपटाला झालाय.
‘लव्हयापा’ दोन दिवसांत फ्लॉप झाला
‘लव्हयापा’ ही एका तरुण जोडप्याची कथा आहे जे २४ तास एकमेकांचे फोन अदलाबदल करतात. यानंतर कथेत अनेक ट्विस्ट येतात. ‘लव्हयापा’ हा तमिळ चित्रपट ‘लव्ह टुडे’चा रिमेक आहे. ‘लव्ह टुडे’चं दिग्दर्शन प्रदीप रंगनाथन यांनी केलं होतं. हा चित्रपट ६ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. ‘लव्ह टुडे’ हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला आणि चित्रपटाने ८३.५५ कोटी रुपये कमावले. खुशी कपूर आणि जुनैद खानच्या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर त्याचं बजेट खूप मोठं आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, हा चित्रपट ६० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे.